AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब – गॅस टंचाईवरून राऊतांचा हल्लाबोल

आखाती युद्धाचा भारतावर, विशेषतः गॅस टंचाईच्या रूपात, गंभीर परिणाम होत आहे. यामुळे नागरिक आणि हॉटेल व्यवसायिक त्रस्त आहेत, अनेकांना गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या परिस्थितीवरून सरकार आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे, कोविड काळातील परिस्थितीची आठवण करून देत सरकारच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Sanjay Raut : नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब - गॅस टंचाईवरून राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊतImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 14, 2026 | 12:39 PM
Share

आखाती देशातील युद्धाच संपूर्ण जगावर परिणाम होत असून भारतातही लोकांच्या आयुष्यावर परिणाम होताना दिसत आहे. एकीकडे युद्धामुळे निर्यातीवर परिणाम झाला असून अनेक शतकऱ्यांचा माल देशात अडकून सडत चालला आहे, त्यांचं नुकसान होतंय. तर दुसरीकडे गॅस टंचाई असून लोकांना गॅस सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहवा लागतंय, हॉटेल मालकांना चुलीचा सहारा घ्यावा लगोतय. तर काहींवर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे. देशात गोंधळाची परिस्थिती असून महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हे चित्र दिसत आहे. गॅस टंचाईच्या याच मुद्यावरू शिवसेना ठाके गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

राऊतांचा घणाघात

माझ्या घरात ही परिस्थिती आहे, माझ्या पत्नीला दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाहीये असं राऊत म्हणाले. महानगर गॅसचं येतंय पण आम्हाला एखादं सिलेंडरही लागतंय, सिलेंडरची गरज सर्वांनाच लागत्ये. सकालपासून मला 60-70 लोकं भेटले, सिलेंडर कुठून मिळवायचा विचारत होते. राजधानी दिल्लीत एका घोषणेने धूम माजवली आहे, ती म्हणजे नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब.. त्याचं उत्तर नरेंद्र मोदीनी दिलं पाहिजे असा टोला राऊतांनी मारला.

देशभरात मोठमोठ्या रांगा लागल्या आहे सिलेंडरसाठी. लखनऊ, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली ते अगदी जम्मूपर्यंत हीच स्थिती आहे. नोदबंदीनंतर आता लोकं सिलेंडरसाठी लाईनीत उभे आहेत. नोटबंदीच्या वेळेस ज्या रांगा लागल्या, त्या रांगेत लोकं मारली गेली, तेच आता सिलेंडरच्या रांगेत होऊ शकतं अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसतंय.  हे  सरकार जनता विरोधी आहे, आंतराराष्ट्रीय राजकारणात सरकार संपूर्ण अपयशी ठरल्यामुळे आपल्या देशावर ही परिस्थिती ओढावली आहे. लोकांना रांगेत उभं करणं आणि मारणं हा भारतीय जनता पार्टीचा छंद आहे, असा घणाघाती हल्लााही राऊतांनी चढवला.

मोदींंवर खोचक शब्दांत टीका

कोविडच्या काळात जसं सांभाळून घेतलं, ही परिस्थिती देखील सांभाळेन, असं म्हणत पंतप्रधानांनी लोकांना न घाबरण्याचं आवाहन केलं. मात्र त्यांच्या या विधानावरूनही राऊतांनी मोदींवर जोरदार टीका केली. हो, हो, कोविडच्या काळात त्यांनीदेश सांभाळला ना. गंगा नदीत लोकांची प्रेतं वहात होती, गुजरातमध्ये चिता जाळण्यासाठी स्मशानभूमीत लोकांना जागा मिळत नव्हती ..,  असा खोचक टोला हाणत, काय सांभाळलं यांनी असा रोकठोक सवाल राऊत यांनी विचारला.

Follow Us
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.