काँग्रेस सॉफ्ट हिंदूत्वाच्या दिशेने, राहुल-प्रियांका कुंभमेळ्यात डुबकी घेणार

नवी दिल्ली : काँग्रेसचं महासचिवपद सांभाळण्यापूर्वी प्रियांका गांधी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्याची शक्यता आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी कुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार आहेत. यानंतर प्रियांका गांधींच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात होईल. 4 फेब्रुवारीला कुंभमेळ्यातलं दुसरं शाही स्नान आहे. या शाही स्नानानंतर प्रियांका आणि राहुल गांधी यांची लखनौमध्ये संयुक्त …

Poltical Headlines, काँग्रेस सॉफ्ट हिंदूत्वाच्या दिशेने, राहुल-प्रियांका कुंभमेळ्यात डुबकी घेणार

नवी दिल्ली : काँग्रेसचं महासचिवपद सांभाळण्यापूर्वी प्रियांका गांधी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्याची शक्यता आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी कुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार आहेत. यानंतर प्रियांका गांधींच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात होईल. 4 फेब्रुवारीला कुंभमेळ्यातलं दुसरं शाही स्नान आहे. या शाही स्नानानंतर प्रियांका आणि राहुल गांधी यांची लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषदही होण्याची शक्यता आहे.

काही कारणास्तव 4 फेब्रुवारी रोजी शाही स्नान न करता आल्यास, 10 तारखेला पवित्र स्नान करतील. 10 फेब्रुवारी हा देखील एक चांगला मुहूर्त आहे. या दिवशी वसंत पंचमी आणि तिसरं शाही स्नान आहे. प्रियांका आणि राहुल यांनी शाही स्नान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कुंभमेळ्यात शाही स्नान केलं होतं.

2019 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना राजकारणात आणत उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेल्या पूर्व उत्तर प्रदेशमध्ये 40 ते 40 जागा आहेत, ज्यात वाराणसी, गोरखपूर, मुगलसराय या भाजपच्या बालेकिल्ल्यांचाही समावेश आहे. 2014 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी भाजपने 72 जागा जिंकल्या होत्या.

निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधींनी मंदिरात जाणं हे गेल्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपासून दिसून आलंय. त्यामुळे काँग्रेसने सॉफ्ट हिंदूत्वाच्या दिशेने वाटचाल केल्याचं राजकीय विश्लेषकांमध्ये बोललं जातं. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी अनेक मंदिरांमध्ये पुजा केली होती. गुजरातशिवाय कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीतही राहुल गांधींनी हिंदूत्त्वाच्या दिशेने पाऊल टाकलं होतं.

राहुल गांधींचं हिंदूत्तव पूजा अर्चा करण्यापर्यंतच मर्यादित नाही. त्यांनी मानसरोवर यात्राही केली होती. राजस्थान विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी स्वतःला जनेऊधारी हिंदू सांगितलं होतं. तर एका मंदिरात पूजा करताना त्यांनी स्वतःला गोत्र दत्तात्रय आणि ब्राह्मण असल्याचंही म्हटलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *