AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसब्यात भाजपला नेमकं काय भोवलं? पैसे वाटपाचे आरोप की ब्राह्मण समाजाची नाराजी? काय घडलं नेमकं?

विधान परिषद निवडणुकांनंतरचा भाजपाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. केंद्रात, राज्यात सत्तेत असले तरी भाजपाला थेट मुळापर्यंत जाऊन पराभवाची कारणं शोधावीच लागतील.

कसब्यात भाजपला नेमकं काय भोवलं? पैसे वाटपाचे आरोप की ब्राह्मण समाजाची नाराजी? काय घडलं नेमकं?
Image Credit source: social media
| Updated on: Mar 02, 2023 | 12:56 PM
Share

पुणे : आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट म्हणून कसबा (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोट निवडणुकांकडे पाहिलं जातंय. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या ताकतीनं निवडणुकीचा आखाडा गाजवला गेला. भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपाच्याही दिग्गजांना प्रचारसभांमध्ये उतरवलं. निवडणुकीची रणनीती आखण्यापासून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अन् ऐन मतदानाच्या आधीपर्यंत शिंदे,फडणवीस सगळेच उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी मैदानात उतरले होते. निवडणुकीआधी भाजपने केलेल्या सर्वेक्षणांतून जे चित्र दिसून आलं, तेच घडेल की काय अशी भीती होती. त्यामुळे सगळ्याच बाजूंनी जोर लावण्यात आला. मात्र कसब्यात काँग्रेसचा विजय झाला. रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी झाले. विधान परिषद निवडणुकांनंतरचा भाजपाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. केंद्रात, राज्यात सत्तेत असले तरी भाजपाला थेट मुळापर्यंत जाऊन पराभवाची कारणं शोधावीच लागतील. कसब्यात भाजपाला हार का पत्करावी लागली, याच्या कारणांपैकी प्रमुख

कारणं पुढील प्रमाणे-

  •  दिवंगत आमदाराच्या घरातच तिकिट द्यावं अशी अपेक्षा होती. भाजपने चिंचवडमध्ये तिकिट दिलं. पण कसब्यात टिळक घराण्यात उमेदवारी दिली नाही. त्यामुळे केवळ टिळक समर्थकच नव्हे तर इतर ब्राह्मण समाजही नाराज असल्याची चर्चा होती. अनेक भाजपचे पदाधिकारीही उमेदवारी अर्ज भरण्यास गैरहजर होते.
  •  उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कसब्यात ब्राह्मण समाजाने लावलेल्या पोस्टर्समधून त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती. त्यातच हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी निवडणूक लढली. त्यामुळे हिंदू मतांमध्ये फूट पडली.
  •  ऐन मतदानाच्या एक दिवस आधी भाजपने मतदारांना पैसे वाटप केल्याचे व्हिडिओ कसबा पेठेत तुफ्फान व्हायरल झाले. राज्यातील सत्तांतरात भाजपने पैशांनी आमदार विकत घेतल्याचे आरोप केले जात आहेत. त्यातच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर थेट पैसे वाटल्याचे आरोप करत मतदानाच्या आदल्या दिवशीच उपोषण सुरु केलं. याचा परिणामही मतदानावर झाला असू शकतो.
  •  मतांच्या आकड्यांसाठी भाजप काहीही करू शकतो, अशी प्रतिमा हळू हळू जनमानसात ठसत आहे. गिरीश बापट यांना नाकात ऑक्सिजनच्या नळ्या असतानाही त्यांना प्रचारात आणलं गेलं. याचा नकारात्मक परिणाम झाल्याचं म्हटलं जातंय.

मनसेची छुपी मदत?

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पूर्वाश्रमीचे मनसे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मनसेने त्यांना आतून मदत केल्याचं म्हटलं जातंय. पुण्यात एकनाथ शिंदे गटाचा फार प्रभाव नसल्याने भाजपाला एकट्याच्या ताकतीवर हा गड शाबूत ठेवायचा होता. तर सध्या काँग्रेसमध्ये असूनही रवींद्र धंगेकर हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. मनसेने धंगेकर यांना छुपा पाठिंबा दिल्यानेच भाजपची मतं कमी झालं, असंही एक प्रमुख कारण सांगितलं जातंय.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.