‘वर्षपूर्ती जबाबदारीची, नांदी शाश्वत विकासाची’, महापौर मोहोळांचं एका वर्षाचं रिपोर्टकार्ड

'वर्षपूर्ती जबाबदारीची, नांदी शाश्वत विकासाची', असं म्हणत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या एक वर्षाच्या कामाचं रिपोर्टकार्ड सादर केलं आहे.

'वर्षपूर्ती जबाबदारीची, नांदी शाश्वत विकासाची', महापौर मोहोळांचं एका वर्षाचं रिपोर्टकार्ड
Mayor Murlidhar mohol
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 4:07 PM

पुणे : पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांंना पुण्यनगरीच्या महापौरपदाची जबाबदारी स्वीकारुन बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे. या एक वर्षाच्या काळात त्यांनी अनेक आव्हानांना धीरोदात्तपणे तोंड दिलं. पुण्यात कोरोना विषाणूने हैदोस घातलेला असताना पुणेकरांची अगदी कुटुंबातल्या माणसांप्रमाणे काळजी घेतली. ‘वर्षपूर्ती जबाबदारीची, नांदी शाश्वत विकासाची’, असं म्हणत महापौर मोहोळ यांनी आपल्या एक वर्षाच्या कामाचं रिपोर्टकार्ड सादर केलं आहे. (Pune Mayor Murlidhar Mohol one year report card)

पुणे मेट्रो

जवळपास दहा वर्ष अडथळ्यांच्या कागदी ट्रॅकवर रखडलेली पुणे मेट्रो पूर्णत्वास नेण्याचा आणि पुणेकरांच्या सेवेत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं महापौर मोहोळ म्हणाले. पुणे मेट्रोसाठीचा पाठपुरावा, पाहणी आणि बैठका सातत्याने सुरु असल्याचं देखील मोहोळ यांंनी सांगितलं.

प्रलंबित रस्त्यांच्या कामांना गती

प्रलंबित रस्त्यांच्या कामांना गती, वाहतूक प्रश्न सुटून होणार प्रगती असं ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अनेक रस्त्यांच्या प्रश्नांवर तळमळीने काम केलं. शहरातील नळ स्टॉप उड्डानपूल, बालभारती पौड फाटा रस्ता, पाषाण पंचवटी ते कोथरुड रस्ता, शिवणे खराडी रस्ता, कर्वेनगर-सनसिटी नदीवरील पूल, परांजपे हायस्कूल ते बधाई चौक रस्ता यांवर विशेष परिश्रम घेतल्याचं मोहोळ यांनी सांगितलं.

कचरा प्रकल्प विकेंद्रीकरण

पुणे शहरातील दररोद निर्माण होणारा कचरा, आणि प्रत्यक्ष प्रकल्प याची सांगड घातलाना कचरा प्रकल्पांचे विकेंद्रीकरण करण्याता आले आहे. ही गंभीर असणारी समस्या सोडवण्यात उत्तम यश मिळत असून लवकरच हा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे, असा विश्वास वर्षपूर्तीच्या निमित्ताने मोहोळ यांनी व्यक्त केला.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय

स्थायी समितीचा सदस्य असताना 2017 मध्ये पुणे महापालिकेचे स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी संकल्पणा मांडली. गेल्या वर्षभरात पाठपुरावा करुन आज वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. महाविद्यालयासंदर्भात वेळोवेळी पाहणी, बैठका घेत महाविद्यालय पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला. येत्या शैक्षणिक वर्षात 100 प्रवेशाचे नियोजन देखील असल्याचं मोहोळ म्हणाले.

भामा आसखेड प्रकल्प

भामा आसखेड प्रकल्पातून दरवर्षी 2.8 टीएमसी पाणी पुणे शहराच्या पूर्व भागाला मिळणार आहे. त्यामुळे कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर या भागांचा 2041 पर्यंत पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला.

कोरोना संकटाविरोधात सक्षणपणे लढा

कोरोना संसर्गाचे संकट गडद झाले असताना तसंच स्वत: आजाराला बळी पडलेला असताना महापौर मोहोळ यांनी पुणेकरांची काळजी घेण्यात कसर सोडली नाही. अगदी दवाखान्यातून त्यांनी पुणेकरांची काळजी घेतली. ‘इतर महापालिकांच्या तुलनेत पुणे महापालिकेने सर्वच आघाड्यांवर सक्षमपणे लढा दिला. या काळात फिल्डवर राहून सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. सातत्याने विविध विभागांशी समन्वय ठेऊन आरोग्य सेवक, अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगारांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला, असं मोहोळ यांनी सांगितलं.

(Pune Mayor Murlidhar Mohol one year report card)

संबंधित बातम्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता, यंत्रणा सज्ज, पुणेकरांनो काळजी घ्या, महापौर मोहोळ यांचं आवाहन

“फील्डवर छान काम, आता काळजी घ्या” पुण्याचे कोरोनाग्रस्त महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्र्यांचा फोन

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.