AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune MLC Election : पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरणार सोलापूर, भाजपचा नवा डाव काय? प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत काय घडलं? Inside Story 

Pune MLC Election : पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत सोलापूर 'गेमचेंजर' ठरणार असल्याचा दावा चर्चा रंगली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने सोलापुरात बैठकांचा धडाका लावल्याचे दिसत आहे.

Pune MLC Election : पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत 'गेमचेंजर' ठरणार सोलापूर, भाजपचा नवा डाव काय? प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत काय घडलं? Inside Story 
bjp latest news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 8:10 PM
Share

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याची भूमिका गेमचेंजर ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नुकताच सोलापूरचा दौरा केला. या दौऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्षांनी संघटनात्मक बैठका, स्थानिक नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. तसेच शिक्षक संघटनांशी संवाद साधण्यावर भाजपने भर दिल्याचे दिसून आले. दुसरीकडे बार्शीतील शिक्षक-पदवीधर निवडणूक प्रचाराच्या व्यासपीठावर शरद पवार गटाच्या आमदाराची उपस्थिती होती, असा दावा मंत्री गोरे यांनी केला.

बैठकीत काय ठरलं?

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव मैदानात आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे हे उभे आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी बैठकांचा धडाका लावलाय. त्यांनी सोलापुरातील बैठकीतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. प्रत्येकाने जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी,  मतदारांपर्यंत सरकारच्या लोककल्याणकारी कामगिरीचा लेखाजोखा सरकारपर्यंत पोहोचवावा. विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केलं.

चव्हाण यांची आणखी एक बैठक महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सोलापूर महानगर महापालिका क्षेत्रातील प्रतिनिधींसोबतही झाली. त्यांनी संघटनेच्या मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर तुमचे प्रश्न सोडवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेने पत्राद्वारे उमेदवारांना पाठिंबा दिला. तर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा हा दौरा सोलापूर जिल्ह्यात भाजप-महायुतीच्या प्रचाराला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, एकजुटीच्या बळावर दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार अधिक मजबूत झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

विरोधकांच्या तीन आमदारांचा पाठिंबा 

भाजप उमेदवार डॉ. स्मिता जाधव,  कौस्तुभ गावडे यांना विरोधकांच्या तीन आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.  बार्शीत शिक्षक -पदवीधर निवडणूक प्रचाराच्या व्यासपीठावर शरद पवार गटाच्या आमदाराची उपस्थिती होती. करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील हे भाजपच्या व्यासपीठावर होते. आमदार नारायण आबा पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि सांगोल्याचे शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा