PMC election 2022 : भाजपाचे पारंपरिक मतदार यंदा कुणाला देणार कौल? वाचा, प्रभाग 12चा लेखाजोखा

| Updated on: Jun 17, 2022 | 3:55 PM

2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 12 हा मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनीमध्ये येत होता. आता यावेळी प्रभाग 12 औंध-बालेवाडी (Aundh Balewadi) असा असणार आहे. चार उमेदवारांमधील तीन उमेदवार भाजपा तर एक उमेदवार शिवसेनेचा याठिकाणी निवडून आला होता.

PMC election 2022 : भाजपाचे पारंपरिक मतदार यंदा कुणाला देणार कौल? वाचा, प्रभाग 12चा लेखाजोखा
पुणे महापालिका, वॉर्ड 12
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक (PMC election 2022) आता जवळ येवून ठेपली आहे. मे महिन्यात आरक्षणही जाहीर झाले आहे. यंदाही चार नगरसेवकांचे पॅनल असणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजपा अशी रंगतदार लढत या पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठी यावेळी मतदान पार पडणार आहे. 2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 12 हा मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनीमध्ये येत होता. आता यावेळी प्रभाग 12 औंध-बालेवाडी (Aundh Balewadi) असा असणार आहे. मागील वेळी या प्रभागावर भाजपाचे वर्चस्व दिसून आले. कोथरूडमधील हा एक महत्त्वाचा प्रभाग आहे. भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून हा विभाग ओळखला जातो. चार उमेदवारांमधील तीन उमेदवार भाजपा तर एक उमेदवार शिवसेनेचा याठिकाणी निवडून आला होता.

एकूण उमेदवार किती?

प्रभाग 12 अ मधील उमेदवार

शांता उत्तमराव भेलके (शिवसेना),

हे सुद्धा वाचा

हर्षाली दिनेश माथवड (भाजपा),

माधवी किशोर शिंदे (मनसे)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाशांता उत्तमराव भेलके--
भाजपा----
काँग्रेसहर्षाली दिनेश माथवडहर्षाली दिनेश माथवड
राष्ट्रवादीसुहासिनी संतोष तटकरे--
मनसेमाधवी किशोर शिंदे--
अपक्ष----

सुहासिनी संतोष तटकरे (राष्ट्रवादी)

प्रभाग 12 ब मधील उमेदवार

वासंती नवनाथ जाधव (भाजपा)

सुप्रिया संजय काळे (मनसे)

कांचन रुपेश कुबेर (शिवसेना)

सविता बालाजी शिंदे (काँग्रेस)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाकांचन रुपेश कुबेर--
भाजपावासंती नवनाथ जाधववासंती नवनाथ जाधव
काँग्रेससविता बालाजी शिंदे--
राष्ट्रवादी----
मनसेसुप्रिया संजय काळे--
अपक्ष----

प्रभाग 12 क मधील उमेदवार

श्याम प्रभाकर देशपांडे (शिवसेना)

मुरलीधर मोहोळ (भाजपा)

हेमचंद्र रमेश संभूस (मनसे)

रोहिदास सुतार (राष्ट्रवादी)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनाश्याम प्रभाकर देशपांडे--
भाजपामुरलीधर मोहोळमुरलीधर मोहोळ
काँग्रेस----
राष्ट्रवादीरोहिदास सुतार--
मनसेहेमचंद्र रमेश संभूस--
अपक्ष----

प्रभाग 12 ड मधील उमेदवार

मिहीर कृष्णकांत प्रभुदेसाई (भाजपा)

राजन कमलाकर श्रीखंडे (अपक्ष)

पृथ्वीराज शशिकांत सुतार (शिवसेना)

महेश सूर्यकांत विचारे (काँग्रेस)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनापृथ्वीराज शशिकांत सुतारपृथ्वीराज शशिकांत सुतार
भाजपामिहीर कृष्णकांत प्रभुदेसाई--
काँग्रेसमहेश सूर्यकांत विचारे--
राष्ट्रवादी----
मनसे----
अपक्षराजन कमलाकर श्रीखंडे--

विजयी उमेदवार कोण?

अ – हर्षाली दिनेश माथवड (भाजपा)

ब – वासंती नवनाथ जाधव (भाजपा)

क – मुरलीधर मोहोळ (भाजपा)

ड – पृथ्वीराज शशिकांत सुतार (शिवसेना)

प्रभाग क्र. 12, प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे – औंध-बालेवाडी (2022)

औंध, बालेवाडी, विझ्डम पार्क, मिटकॉन स्कूल, लक्ष्मणनगर, चाकणकर मळा, औंधगाव, सिंध सोसायटी, साधू वासवाणीनगर, सकाळनगर, एनसीएल, आनंदपार्क, प्रायमाडोमस बिल्डिंग, गगन क्लोरा, इ.

आरक्षण कसे? (2022)

प्रभाग 12 औंध-बालेवाडी हा प्रभाग जागा क्रमांक 12 अ हा अनुसूचित जाती, ब हा सर्वसाधारण महिला तर क सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असणार आहे.

एकूण लोकसंख्या – 63362
अ. जा. – 8996
अ. ज. – 1045