AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब थोरात यांना भाजापाची ऑफर देणार का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच म्हणाले…

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत.

बाळासाहेब थोरात यांना भाजापाची ऑफर देणार का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच म्हणाले...
Image Credit source: social media
| Updated on: Feb 09, 2023 | 11:53 AM
Share

प्रदीप कापसे, पुणेः बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्या वादानं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) भूकंप झाला आहे. थोरात यांच्या बंडाला आता शिवसेनेनंही पाठिंबा दिल्याचं चित्र आहे. थोरात-पटोले वादात भाजपाचा फायदा होऊ नये, असा इशारा शिवसेनेचं मुखपत्र सामनातून देण्यात आलाय. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला आता भाजपात प्रवेशाची ऑफर मिळते का, आणि मिळाली तर थोरात ती स्वीकारणार का…  याकडे सर्वांचं लागलंय.पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकीच्या भाजप प्रचाराचा नारळ आज फुटला. या प्रसंगी उपस्थित भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थोरातांना भाजपाच्या ऑफरविषयी वक्तव्य केलंय.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

भाजप पदयात्रेत सहभागी झालेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसमधील वादाचा आम्ही फायदा घेणार नाहीत. बाळासाहेब थोरात यांना आम्ही आमच्या रस्त्यावर आणणार नाहीत. त्यांनी कुठे जायचंय, हा निर्णय त्यांनी स्वतःच घ्यायचा आहे. पण काँग्रेस आता अधःपतनाला लागली आहे. महात्मा गांधी यांची काँग्रेस विसर्जित होण्याच्या मार्गावर आहे, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय.

मुंबई तोडण्याची हिंमत…

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदे घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. मुंबई तोडण्याचा भाजपाचा अजेंडा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदा भावनेवर आधारीत असतात. मुंबई तोडणार, असा लोकांमध्ये फक्त भ्रम निर्माण केला जात आहे. पण प्रत्यक्षात मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापामध्ये नाही.. असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय.

शिवसेन आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून सर्वकाही निसटलंय, त्यामुळे ते अशी निराशाजनक वक्तव्ये करतात, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

अजित पवार काँग्रेसच्या उमेदवाराची खात्री देणार?

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसचीही साथ होती, असे म्हटले जात आहे. आता थोरात-पटोले वाद विकोपाला गेल्यानंतर अजित पवार पुण्यात काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची हमी घेणार का, असा प्रश्न विचारला जातोय. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अजित पवार असं म्हणणार नाहीत. कारण दोन्ही ठिकाणी आमचेच उमेदवार विजयी होतील. भाजपा गरीबांसाठी मैदानात उतरला आहे.

कसबा पेठेत प्रचाराचा नारळ फुटला…

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजप नेते हेमंत रासणे विरुद्ध काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढाई होण्याची शक्यता आहे. आज हेमंत रासणे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. भाजपने केसरीवाड्यातून प्रचारासाठी प्रचार यात्रा काढली. यावेळी सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.