“शरद पवार हे माझे गुरु, ते 83 वर्षांचे, पण कोण म्हणेन ते 83 वर्षांचे आहेत”

Sharad Pawar : शरद पवार यांच्या वयावर काँग्रेस नेत्याचं भाष्य; तर अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला, म्हणाले, शरद पवार हे माझे गुरु, ते 83 वर्षांचे, पण कोण म्हणेन ते 83 वर्षांचे आहेत... सरहद संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी काय म्हटलं? वाचा...

शरद पवार हे माझे गुरु, ते 83 वर्षांचे, पण कोण म्हणेन ते 83 वर्षांचे आहेत
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 1:49 PM

पुणे | 20 ऑगस्ट 2023 : पुण्यातील सरहद्द संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज पार पडतोय. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांचा गुरु असा उल्लेख केला आहे. तसंच शरद पवार यांच्या वयावर बोलताना त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांना टोला लगावला आहे.

शरद पवार हे माझे गुरु आहेत. ते परत परत तेच का सांगायचं. 83 वर्ष आहेत. पण मी तर म्हणेन कोण म्हणतंय 83 वर्षांचे आहेत? ते जे स्वाभिमानानं तर करतात. मात्र जे गडबड करतात. त्यांनाही सरळ करतात, असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी अजित पवार आणि भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. सरहद संस्थेच्या कार्यक्रमात शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत पाटील, असं तीन वेगळवेगळ्या पक्षाचे नेते एकाच मंचावर पाहायला मिळाले.

संजय नहार मला नेहमी सांगतात की चंद्रकांत पाटील यांनी मदत केली. ते कसे मदत करतात. याचं मला आश्चर्य वाटलं. कारण आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळच्या विचारसरणीचे आहोत. ते वेगळ्या प्रणालीतले आहेत. पण हे एक चांगलं उदाहरण आहे. कमकुवत असलेल्या माणसाला उभं करण्यासाठी हातभार लागला पाहिजे. प्रत्येकाचा पक्षाचा विचार वेगळा असतो. मात्र चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

सरहद संस्थेच्या या कार्यक्रमात शरद पवार यांनीही संबोधित केलं. ही संस्था देशातील तरुण पिढीमध्ये काम करतीये. काश्मीर सारखं महत्वाचं राज्य आहे. शेजारच्या राष्ट्रामुळे वेगळ्या स्थितीला सामोरं जावं लागतंय. याचा फटका हा तरुण पिढीला बसतोय. एक अस्वस्थता तरुण पिढीमध्ये निर्माण होतीये. ही अस्वस्थता निर्माण व्हावी आणि भारतात काय करता येईल यासाठी शेजारचं राष्ट्र प्रयत्न करतंय. त्याचा परिणाम हा तरुण पिढीला सहन करावा लागत आहे, असं शरद पवार म्हणालेत.

पुणे शहरात गोखले संस्था ही मोठी संस्था काम करते. ही संस्था उभी करताना गोखल्यांच्या बरोबर अनेक राज्यातील लोकांनी मदत केली.या देशात महात्मा गांधीचं नावं घेतलं. महात्मा गांधींचे गुरु हे गोखले होते. पाकिस्तानातही गोखलेंचा उल्लेख पुस्तकात आढळतो. जिनांना मार्गदर्शन करण्यासाठी गोखलेंच योगदान होतं, असं शरद पवार म्हणालेत.

Non Stop LIVE Update
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.