अमरिंदर सिंहांऐवजी राहुल गांधींना 'कॅप्टन' म्हणणं सिद्धूंना महागात

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याऐवजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कॅफ्टन म्हणणं नवज्योत सिंह सिद्धू यांना महागात पडण्याची शक्यता आहे. पंजाबच्या चार मंत्र्यांनी सिद्धूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. करतारपूर कोरिडॉरच्या भूमीपूजनासाठी सिद्धू पाकिस्तानमध्ये गेले होते, त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. हैदराबादामध्ये सिद्धूंना प्रश्न विचारण्यात आला, की मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवायच पाकिस्तानला गेलात का? यावेळी …

अमरिंदर सिंहांऐवजी राहुल गांधींना 'कॅप्टन' म्हणणं सिद्धूंना महागात

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याऐवजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कॅफ्टन म्हणणं नवज्योत सिंह सिद्धू यांना महागात पडण्याची शक्यता आहे. पंजाबच्या चार मंत्र्यांनी सिद्धूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. करतारपूर कोरिडॉरच्या भूमीपूजनासाठी सिद्धू पाकिस्तानमध्ये गेले होते, त्यानंतर या वादाला सुरुवात झाली.

हैदराबादामध्ये सिद्धूंना प्रश्न विचारण्यात आला, की मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवायच पाकिस्तानला गेलात का? यावेळी त्यांनी अमरिंदर सिंह यांची थट्टा उडवली आणि म्हणाले, “राहुल गांधी माझे कॅप्टन आहेत. त्यांनीच मला पाकिस्तानला पाठवलं होतं. राहुल गांधी कॅप्टन अमरिंदर सिंह यांचेही कॅप्टन आहेत”, असं वक्तव्य सिद्धू यांनी केलं आणि ते त्यांच्याच गुगलीत अडकण्याची शक्यता आहे.

हैदराबादमध्ये केलेल्या या वक्तव्यानंतर सिद्धू यांच्यावर ग्रामविकास मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा, महसूल आणि पुनर्वसन मंत्री सुखविंदर सिंह सरकारिया आणि क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंह सोधी यांनी नाराजी व्यक्त केली. या मुद्द्यावर इतर सर्व मंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत आहेत, असं सोधी यांनी सांगितलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतही हा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे. “सिद्धू अमरिंदर सिंह यांना त्यांचा कॅप्टन मानत नसतील, तर नैतिक आधारावर त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे आणि राहुल गांधी जे काम देतील ते करावं”, असं बाजवा म्हणाले. कॅप्टन अमरिंदर सिंह यांची माफी मागावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सिद्धू यांची ही भाषा आक्षेपार्ह असल्याचं अन्य मंत्र्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे आमचे नेता असून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पंजाबमध्ये सरकारचं नेतृत्त्व कॅप्टन अमरिंदर यांच्याकडे आहे आणि तेच सर्व टीमचे कॅप्टन आहेत. सिद्धू किंवा अन्य कुणाला काही अडचण असेल आणि ते अमरिंदर सिंहांच्या नेतृत्त्वात काम करु शकत नसतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं सरकारिया म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *