मी पक्ष सोडला म्हणून थोरातांना पद, गांधी-नेहरु सोडून ते ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवतात : राधाकृष्ण विखे पाटील

| Updated on: Jun 20, 2020 | 3:10 PM

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारसोबतच बाळासाहेब थोरात यांच्यावर घणाघाती टीका केली आहे (Radhakrishna Vikhe on Balasaheb Thorat).

मी पक्ष सोडला म्हणून थोरातांना पद, गांधी-नेहरु सोडून ते मातोश्रीचे उंबरठे झिजवतात : राधाकृष्ण विखे पाटील
Follow us on

अहमदनगर : भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारसोबतच काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर घणाघाती टीका केली आहे (Radhakrishna Vikhe on Balasaheb Thorat). राज्य सरकारचं गोंधळलेलं आहे. कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही, असा आरोप विखेंनी केला आहे. यावेळी त्यांनी मी पक्ष सोडला म्हणूनच बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षात पद मिळालं, असा दावाही केला. तसेच बाळासाहेब थोरात यांचं स्वतःचं कर्तुत्व काय असा प्रश्नही उपस्थित केला.

राधाकृष्ण विखे म्हणाले, “मी काँग्रेस पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना पद मिळालं. या बाळासाहेब थोरातांचं स्वतःचं कर्तृत्व काय? गांधी-नेहरुंचे विचार सोडून ते मातोश्रीचे उंबरठे झिजवत आहेत. राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी पुढाकार घेतला असता, तर आनंद वाटला असता. मात्र केवळ सत्तेत वाटा मिळवण्यासाठी लाचारी केली जात आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु आहे.”

“राज्य सरकारचं गोंधळलेलं आहे. कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. दररोज नविन जीआर निघतो आहे. सरकारमधील मंत्री भांबावलेल्या अवस्थेत वक्तव्यं करत आहेत. महाराष्ट्रातील जनता, विद्यार्थी, पालक शिक्षक सगळेच संभ्रमात आहेत. सरकार टिकवण्यासाठी सत्तेचा सारीपाठ केला जातोय. वाटा मिळाला पाहिजे, घाटा नको यासाठीच अनेकांची धडपड सुरु आहे. राज्यातील जनता आणि शेतकऱ्यांची अवस्था काय झालीय ? त्यासाठी मात्र काहीही केलं जात नाही. मात्र, स्वतःच्या फायद्यासाठी धडपड केली जात आहे,” असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

“महसुलच्या निवृत्त अधिकाऱ्यांना परत बोलवण्यात गौडबंगाल”

राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बाळासाहेब थोरोतांवर भ्रष्टाचाराचाही आरोप केला. ते म्हणाले, “बाळासाहेब थोरात महसूलच्या निवृत्त अधिकाऱ्यांना परत बोलवत आहेत. असं करण्यात मोठं गौडबंगाल आहे. बाळासाहेब थोरात यांनी याचा खुलासा करावा.”

“शिवसेनेने पुन्हा भाजपासोबत यावं”

राधाकृष्ण विखे म्हणाले, “शिवसेनेची प्रचंड फरफट झाली आहे. सत्तेचा हव्यास असणाऱ्या लोकांबरोबर काम करताना उद्धव ठाकरेंना तडजोड करावी लागत आहे. विचारधारेमुळे अनेक वर्ष शिवसेना भाजपाची युती अभेद्य होती. शिवसेनेने पुन्हा भाजपसोबत येण्याची भूमिका स्विकारायला हवी. हिंदुत्वाची कास धरताना सेना भाजपने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे.”

मी कुणाच्या पाया पडलो हे बघण्यापेक्षा तुम्ही अगोदर काय करत होतात? हे बघा असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांवर घणाघाती टीका केली.

संबंधित बातम्या :

विखेंनी वापरलेला ‘लाचार’ शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य, विखेंच्या टीकेला थोरांतांचं प्रत्युत्तर

आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा : काँग्रेस

Devendra Fadnavis Exclusive | कुरकुरणारी खाट बाजूला ठेवा, काँग्रेसच्या लाचारीबद्दल आश्चर्य : देवेंद्र फडणवीस

Radhakrishna Vikhe criticize Balasaheb Thorat