AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis Exclusive | कुरकुरणारी खाट बाजूला ठेवा, काँग्रेसच्या लाचारीबद्दल आश्चर्य : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली (Devendra Fadnavis slams Thackeray Government).

Devendra Fadnavis Exclusive | कुरकुरणारी खाट बाजूला ठेवा, काँग्रेसच्या लाचारीबद्दल आश्चर्य : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jun 16, 2020 | 6:49 PM
Share

मुंबई :राज्य सरकारने कोरोनाविरोधाच्या लढाईकडे लक्ष केंद्रित करायला हवं (Devendra Fadnavis slams Thackeray Government). आधीच हे ऑटो रिक्षा सरकार होतं. पण आता या रिक्षाची तीन चाकं तीन दिशेला जात आहेत. सध्या कोरोना संकंटाकडे लक्ष द्या. कुरकुरणारी खाट आणि बाकी विशेषणं बाजूला ठेवा”, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला (Devendra Fadnavis slams Thackeray Government).

“काँग्रेसच्या लाचारीबद्दल आश्चर्य वाटतं. एवढी लाचारी कधी पाहिली नव्हती. पण सत्तेसाठी सगळ्यांना सगळं काही पटतं. इथे प्रत्येकजण लाचार आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“राज्य सरकार निर्णय घेत नाही, यात 12 बलुतेदार समाज पिचला जातोय. नाभिक समाजाबद्दल केंद्राने कधीच परवानगी दिली. पण राज्य सरकारला याचं गांभीर्य नाही. सरकार मदत करणं सोडाच पण व्यवसायही करु देत नाही. अशा पद्धतीन जर माणूस उपाशी मरायला लागला तर लोक रस्त्यावर येतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही. कापूस, मका, तूर असा सगळा माल घरात पडून आहे. सरकार मात्र काहीच करत नाही. केंद्र सरकार पैसे देत असूनही राज्य सरकार काही करत नाही. मुंबईच्या बाहेरही महाराष्ट्र आहे, हे या सरकारला आता सांगावं लागत आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘कोरोनाबाधित मृतांचे आकडे लपवून काय मिळणार आहे?’

“कोरोनाबाधित मृतांचे आकडे लपवणं हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. मुंबईतले आकडे लपवून काय मिळणार आहे? मुंबईत आयसीएमआरच्या निर्णयाविरोधात जाऊन 900 ते 1000 मृत्यू लपवण्यात आले. मग ‘डेथ ऑडिट कमिटी’ नेमकी कश्यासाठी बनवली आहे? मृत्यू लपवायला की मृत्यू कमी करायला कमिटी बनवली आहे? ही क्रिमिनल कॉन्सपसरी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मुंबईत आधी कोरोना टेस्ट कमी केल्या. आता मृत्यूचे आकडे लपवत आहेत. कोरोना रुग्णांच्या आकड्यांचा खेळ आणि मृतांचे आकडे लपवणं याविरोधात कारवाई केलीच पाहिजे”, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

“आकडे लपवून परिस्थितीला पांघरुन घालण्याचं कारण काय? आपण कोरोना रुग्ण लपवून समस्या लपवत आहोत. यामुळे आपण ही समस्या वाढवतच आहोत. पण, सत्य लपूच शकत नाही”, असंदेखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘हे मयताच्या कपाळावरचं लोणी खाण्याचं काम’, देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना महापौरांचं उत्तर

Devendra Fadnavis | मुंबईतील 950 पेक्षा जास्त कोरोना मृत्यू का लपवले?, फडणवीसांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.