महागठबंधनच्या व्हॉट्सअप ग्रुपची चॅटिंग व्हायरल, देवेगौडांवर मायावती भडकल्या

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. 23 मे रोजी निकालही जाहीर होईल. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसकडून प्रादेशिक पक्षांना एकत्र आणलं जातंय. या सर्व पक्षांशी ताळमेळ साधण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक आयडिया सुचली आणि त्यांनी सर्वांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. याबाबतचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा फक्त एक विनोदी व्हिडीओ …

महागठबंधनच्या व्हॉट्सअप ग्रुपची चॅटिंग व्हायरल, देवेगौडांवर मायावती भडकल्या

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. 23 मे रोजी निकालही जाहीर होईल. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसकडून प्रादेशिक पक्षांना एकत्र आणलं जातंय. या सर्व पक्षांशी ताळमेळ साधण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक आयडिया सुचली आणि त्यांनी सर्वांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. याबाबतचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा फक्त एक विनोदी व्हिडीओ असला तरी तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

या व्हिडीओचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याचंही सोशल मीडियावर सांगितलं जातंय. पण पोट धरुन हसायला लावणारा हा व्हिडीओ आहे. “राहुल गांधी ग्रुप तयार करताच पहिला मेसेज करतात, हा आपला महागठबंधनचा ऑफिशिअल ग्रुप आहे, सर्व विरोधी पक्ष नेत्यांनाही अॅड केलंय. कुणी सुटलं असेल तर प्लीज अॅड करा.” इथपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होतं, पण मध्येच एक ट्वीस्ट आला.

राहुल गांधींचा मेसेज वाचताच कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी त्यांचे वडील एचडी देवेगौडा यांना अॅड करतात. अॅड केल्यानंतर एचडी कुमारस्वामी पहिला मेसेज करतात, “डॅड, हा ग्रुप आम्ही यासाठी केलाय, की तुम्हाला पंतप्रधान करता यावं.”

कुमारस्वामींचा हा मेसेज वाचल्यानंतर बसपाच्या अध्यक्ष मायावती चांगल्याच भडकल्या. मायावतींनी मेसेज केला की, “माननीय देवेगौडाची, आम्ही तुमचा आदर करतो, पण तुम्हाला पंतप्रधान नाही करु शकत.”

सोशल मीडियावर राजकीय नेत्यांवर मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. पण पोट धरुन हसायला लावणारा हा व्हिडीओ लोकप्रिय झालाय.

पाहा व्हिडीओ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *