‘मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या’, संत बाबा राम सिंहांच्या मृत्यूवर राहुल गांधींचा आक्रोश

| Updated on: Dec 17, 2020 | 8:27 AM

राहुल गांधी यांनी संत बाबा राम सिंह यांना श्रद्धांजली वाहली आणि केंद्र सरकारला अपील केली की त्यांनी शेती विरोधी कायद्याला परत घ्यावं.

मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, संत बाबा राम सिंहांच्या मृत्यूवर राहुल गांधींचा आक्रोश
Follow us on

नवी दिल्ली : शेतकरी कायद्याविरोधी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला (Delhi Farmers Proetst) आता 21 दिवस उलटले आहेत (Rahul Gandhi Get Angry On Modi Govt). यादरम्यान, बुधवारी एका 65 वर्षीय शेतकऱ्याने सिंघु बॉर्डर प्रदर्शन स्थळावर आत्महत्या केली. आत्महत्या केलेली व्यक्ती ही हरयाणा करनाल जिल्ह्यातील सिंघरा गावातील संत बाबा राम सिंह (Sant Baba Ram Singh Commits Suicide) होते. ची एक सुसाइड नोटही समोर आली असून, त्यात त्यांनी शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवित असल्याचं नमूद केलं आहे (Rahul Gandhi Get Angry On Modi Govt).

यावर आता काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. याबाबत राहुल गांधी यांनी ट्वीट केलं. “हरयाणाच्या एका संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांची वाईट अवस्था पाहून आत्महत्या केली”. यावेळी राहुल गांधी यांनी संत बाबा राम सिंह यांना श्रद्धांजली वाहली आणि केंद्र सरकारला अपील केली की त्यांनी शेती विरोधी कायद्याला परत घ्यावं.

“हरयाणाच्या एका संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांची वाईट अवस्था पाहून आत्महत्या केली. या दुखा:च्या प्रसंगी मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली आहे. मोदी सरकारने मात्र क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. हट्ट सोडा आणि तात्काळ शेती कायदा मागे घ्या”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.

संत बाबा रामसिंहांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

संत बाबा राम सिंह यांचे फक्त हरियाणा आणि पंजाबमध्येच नव्हे तर जगभरात कोट्यवधी अनुयायी आहेत. सिंघू बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झालेल्या संत बाबा रामसिंह कर्नाल यांनी स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. मला शेतकऱ्यांचं दुःख मला बघवत नाही आणि केंद्र सरकार काही करत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे, असं सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिलं आहे.

केजरीवाल यांचं ट्वीट

राम सिंह यांच्या आत्महत्येवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही ट्वीट केलं. “संत बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. आपला शेतकरी त्याचा हक्कच मागत आहे. सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं आणि तीनही काळे कायदे परत घ्यायला हवे”, असं ते ट्वीटमध्ये म्हणाले.

Rahul Gandhi Get Angry On Modi Govt

संबंधित बातम्या :

दिल्ली शेतकरी आंदोलन : महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या भूमिका काय?

शेतकऱ्यांना हटवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी, समिती स्थापन्याचा इशारा

‘कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलेय’

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग