AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली शेतकरी आंदोलन : महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या भूमिका काय?

सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने 8 डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे.

दिल्ली शेतकरी आंदोलन : महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या भूमिका काय?
| Updated on: Dec 06, 2020 | 4:25 PM
Share

मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. (Delhi Farmer Protest) हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आपापली भूमिका जाहीर केली केली आहे. (Shivsena NCp And Congress Stand On Delhi Farmer Protest)

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रीय पाठिंबा देत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

भारत बंदला महाराष्ट्र काँग्रेसचा पाठिंबा

केंद्राने आणलेल्या कृषी कायद्याविषयी शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. राहुल गांधी यांनी पंजाब आणि हरियाणामध्ये या काळ्या कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅली ही काढल्या आहेत. महाराष्ट्रातही विविध आंदोलने करुन या कायद्यांना विरोध दर्शवलेला आहे. 8 डिसेंबरच्या भारत बंदमध्येही राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहतील. यावेळी धरणे आंदोलन, निषेध मोर्चे काढून या बंदमध्ये सहभागी होतील, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी

शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा (Prem Singh Chandumajra) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यावर चर्चा झाली. “केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा मोडीत काढण्यासाठी देशातील सर्व स्थानिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आम्ही भेट घेत आहोत. सर्व पक्षांनी एकत्र यावे, यासाठी आम्ही हे आव्हान करत आहोत” अशी प्रतिक्रिया खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी यावेळी दिली. शिरोमणी अकाली दलाची भूमिका मान्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीदरम्यान सांगितले. शिवसेना पक्ष शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना भारत बंदमध्ये सहभागी होणार का?, असा प्रश्न शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना विचारला असता त्या म्हणाल्या,  “भारत बंदमध्ये सहभागी व्हायचं की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील”.

‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हायचं की नाही, राष्ट्रवादी उद्या निर्णय घेण्याची शक्यता

“आमचा शेतकरी आंदोलनाला सशर्त पाठिंबा आहे. शेतकरीविरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत, तसा पुनर्विचार केंद्र सरकारने करावा, अशी आमची मागणी आहे, असं सांगताना भारत बंदमध्ये सहभागी व्हायचं की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेतील”, असं मंत्री नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.

(Shivsena NCp And Congress Stand On Delhi Farmer Protest)

संबंधित बातम्या

BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार

‘एनडीए’बाहेर पडलेल्या दोन पक्षांची भेट, अकाली दलाचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.