राहुल गांधींचं ‘ब्रेकफास्ट पॉलिटिक्स’; 15 पक्षांचे 100 खासदार एकवटले; संसदेवर ‘सायकल मार्च’

| Updated on: Aug 03, 2021 | 10:50 AM

पेगासस प्रकरणावरून भाजपला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विरोधकांना एकत्र केले आहे. राहुल यांनी सर्व विरोधकांना ब्रेकफास्टसाठी बोलावलं होतं. (Rahul Gandhi's breakfast meet with Opposition MPs amid Parliament logjam)

राहुल गांधींचं ब्रेकफास्ट पॉलिटिक्स; 15 पक्षांचे 100 खासदार एकवटले; संसदेवर सायकल मार्च
rahul gandhi
Follow us on

नवी दिल्ली: पेगासस प्रकरणावरून भाजपला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विरोधकांना एकत्र केले आहे. राहुल यांनी सर्व विरोधकांना ब्रेकफास्टसाठी बोलावलं होतं. आता हे सर्व विरोधक इथूनच सायकलवर बसून संसदेत जात आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ब्रेकफास्ट पॉलिटिक्सकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Rahul Gandhi’s breakfast meet with Opposition MPs amid Parliament logjam)

राहुल गांधी कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये सर्व विरोधी खासदारांना आपल्या निवासस्थानी नाश्त्याला बोलावलं होतं. या ब्रेकफास्ट मिटींगला 15 पक्षाचे 100 खासदार आले होते. यात काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, राजद, शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, सीपीआयएम, सपीआय, आययूएमएल, आरएसपी, केसीएम, झामुमो, नॅशनल कॉन्फरन्स, आणि लोकजनशक्ती पार्टीच्या नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान या बैठकीला आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचा एकही सदस्य उपस्थित नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पेगाससवर चर्चा व्हावी

सत्ताधारी भाजप आमचं म्हणणं ऐकून घेत नाही. त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावरची लढाई लढतानाच संसदेतही लढाई लढावी लागणार आहे. कोरोनावर चर्चा झाली आहे. तशी पेगाससवर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

म्हणून राहुल गांधी सक्रिय

दरम्यान, पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधक एकवटत असल्याचंही बोललं जात आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राहुल गांधी सक्रिय झाल्याचं सांगितलं जात आहे. (Rahul Gandhi’s breakfast meet with Opposition MPs amid Parliament logjam)

 

संबंधित बातम्या:

जम्मू काश्मीरमधील टॉप 10 दहशतवादी कोण? पोलिसांककडून यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर

Explainer : विम्याबाबत सरकारचे मोठे पाऊल, देशातील प्रत्येक नागरिकाला विम्याचा लाभ मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणखी एका सल्लागाराचा राजीनामा; 10 वर्षात दुसऱ्या अधिकाऱ्याचा PMOला रामराम

(Rahul Gandhi’s breakfast meet with Opposition MPs amid Parliament logjam)