पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणखी एका सल्लागाराचा राजीनामा; 10 वर्षात दुसऱ्या अधिकाऱ्याचा PMOला रामराम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार अमरजीत सिन्हा यांनी पदाचा राजीनामा दिल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, त्याला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही. (Prime Minister Narendra Modi adviser Amarjeet Sinha resigns from his post)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणखी एका सल्लागाराचा राजीनामा; 10 वर्षात दुसऱ्या अधिकाऱ्याचा PMOला रामराम
Amarjeet Sinha

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार अमरजीत सिन्हा यांनी पदाचा राजीनामा दिल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, त्याला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही. पंतप्रधान कार्यालयाला सोडचिठ्ठी देणारे गेल्या दहा वर्षातील सिन्हा हे दुसरे अधिकारी आहेत. (Prime Minister Narendra Modi adviser Amarjeet Sinha resigns from his post)

अमरजीत सिन्हा हे 1983च्या बॅचचे प्रशासकिय अधिकारी आहेत. गेल्या वर्षीच फेब्रुवारीमध्ये त्यांना पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सामाजिक क्षेत्राशी निगडीत प्रकल्पावर ते काम करत होते. दोन वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमरजीत सिन्हा यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान कार्यालयातील एका अधिकाऱ्यानेच ही माहिती दिली आहे. या वर्षातील हा पहिलाच राजीनामा आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मोदींचे मुख्यसचिव पी. के. सिन्हा यांनी राजीनामा दिला होता.

अनेक विभागांचा अनुभव

अमरजीत सिन्हा आणि भास्कर खुलबे या दोन्ही अधिकाऱ्यांची एकाचवेळी पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. सिन्हा 2019मध्ये ग्राम विकास मंत्रालयातून सचिव म्हणून निवृत्त झाले होते. गेल्या तीन दशकाच्या कार्यकाळात सिन्हा यांनी शिक्षण आणि पंचायत राज सारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. पंतप्रधान आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आणि रोहयो आदी महत्त्वाच्या योजनांमध्येही त्यांचं विशेष योगदान राहिलं आहे.

उच्च शिक्षित अधिकारी

सिन्हा हे दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन्स कॉलेजचे टॉपर होते. त्यांना ऑक्सफर्ड केंब्रिज सोसायटीची स्कॉलरशीपही मिळाली होती. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहे. शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन विषयात त्यांचा हातखंडा आहे. बिहार आणि झारखंडच्या नक्षल प्रभावित भागातही त्यांनी काम केलं होतं. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकादमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणून भविष्यातील अनेक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं. (Prime Minister Narendra Modi adviser Amarjeet Sinha resigns from his post)

 

संबंधित बातम्या:

eRUPI डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती आणणार, नरेंद्र मोदींकडून लोकार्पण, नेमके फायदे काय?

पंचनाम्याची वाट न पाहता व्यापाऱ्यांना विम्याची 50 टक्के रक्कम तातडीने द्या; राष्ट्रवादी, शिवसेनेचे खासदार सीतारामन यांना भेटले

Jammu-Kashmir : दगडफेक करणाऱ्यांना झटका, आता ना सरकारी नोकरी, ना परदेश प्रवास

(Prime Minister Narendra Modi adviser Amarjeet Sinha resigns from his post)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI