AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu-Kashmir : दगडफेक करणाऱ्यांना झटका, आता ना सरकारी नोकरी, ना परदेश प्रवास

जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने केंद्र शासित प्रदेशात कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्यांना जरब बसावी म्हणून मोठा निर्णय घेतलाय. यानुसार सीआयडीच्या विशेष शाखेने सर्व युनिट्सला याबाबत निर्देश दिलेत.

Jammu-Kashmir : दगडफेक करणाऱ्यांना झटका, आता ना सरकारी नोकरी, ना परदेश प्रवास
| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 4:53 PM
Share

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने केंद्र शासित प्रदेशात कायदा सुव्यवस्था भंग करणाऱ्यांना जरब बसावी म्हणून मोठा निर्णय घेतलाय. यानुसार सीआयडीच्या विशेष शाखेने सर्व युनिट्सला याबाबत निर्देश दिलेत. राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना सरकारी नोकरी देऊ नये आणि परदेश प्रवासाचीही परवानगी देऊ नये, असं यात म्हटलंय.

अधिकारी यासाठी सर्व डिजीटल पुरावे आणि पोलिस रेकॉर्डचाही विचार करेल. या सर्कुलरमध्ये सीआयडीने आपल्या विशेष शाखेला पासपोर्ट, इतर सेवा आणि सरकारी योजनांसाठीच्या ना हरकत प्रमाणपत्राच्या वेळी संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष देण्यास सांगितलंय. याशिवाय स्थानिय पोलिसांकडील रेकॉर्डमध्येही या व्यक्तींची माहिती तपासण्यास सांगितलीय.

कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरोधात पुरावे गोळा करण्याचे निर्देश

सीआयडीने कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरोधात पुरावे गोळा करण्याचे निर्देशही दिलेत. तसेच ज्यांच्या विरोधात पुरावे सापडतील त्यांना सुरक्षा मंजुरी न देणे आणि सरकारी नोकरीपासून वंचित ठेवण्याच्या सूचना केल्यात.

विशेष म्हणजे याआधी हे सर्कुलर निघण्याआधी देखील काही व्यक्तींवर असे प्रतिबंध घालण्यात आलेत. जुलै 2021 मध्ये जम्मू-काश्मीर प्रशासनाने हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सैयद सलाहुद्दीनच्या दोन मुलांसह 11 सरकारी कर्मचाऱ्यांना देश-विरोधी आणि दहशतवादी कृत्य केल्याच्या आरोपाखाली नोकरीवरुन काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 30 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा

किश्तवारमध्ये स्वातंत्र्य दिन आणि कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आलाय. पोलिसांनी शहरातील सर्वाधिक सक्रीय दहशतवाद्यांचे पोस्टर देखील लावलेत. तसेच दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 30 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केलीय.

हेही वाचा :

पावसाने देशभरात हाहाकार, महाराष्ट्रासह उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधील थरारक दृश्ये

Video: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, SDRF च्या तीन टीम तैनात, व्हिडीओ व्हायरल

जम्मू काश्मीरमध्ये आभाळ फाटलं, 4 मृत्यू, 40 बेपत्ता; हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू

व्हिडीओ पाहा :

Jammu Kashmir administration impose restrictions on accused of stone pelting for abroad travel and government job

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.