जम्मू काश्मीरमध्ये आभाळ फाटलं, 4 मृत्यू, 40 बेपत्ता; हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 40 जण बेपत्ता झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे 5 ते 8 घरांसह रेशन दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे. (Cloudburst in jammu kashmir)

जम्मू काश्मीरमध्ये आभाळ फाटलं, 4 मृत्यू, 40 बेपत्ता; हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू
Cloudburst in Kishtwar
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 10:56 AM

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 40 जण बेपत्ता झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे 5 ते 8 घरांसह रेशन दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. प्रचंड पावसामुळे या ठिकाणी नेटवर्कची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा संपर्क होत नाही. पाऊसही थांबण्याचं नाव घेत नसल्याने या ठिकाणी हाय अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. (Four dead, many missing due to cloudburst in Kishtwar area of Jammu Kashmir)

देशातील अनेक राज्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जम्मू-काश्मीरपासून 200 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या किश्तवाडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या ठिकाणी मदतीसाठी लष्कर आणि पोलिसांची एक टीम पाठवण्यात आल्याचं किश्तवाडचे जिल्हाधिकारी अशोक कुमार शर्मा यांनी सांगितलं.

जुलै अखेरपर्यंत मुसळधार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून जम्मूच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे. जुलै अखेरपर्यंत हा पाऊस सुरू राहणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. किश्तवाडमधील अधिकाऱ्यांनी नदी, तलाव आणि दरड कोसळण्याच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसात प्रचंड पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नदीनाल्यांच्या पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नदी, नाले, दरड प्रवण क्षेत्राच्या परिसरात जे लोक राहत आहेत, त्यांना धोका निर्माण होऊ शकतो, असं जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.

हिमाचलमध्येही ढगफुटी

जम्मू-काश्मीरपाठोपाठ हिमाचल प्रदेशातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात पूर आला असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 10 लोक बेपत्ता आहेत. हिमाचलच्या लाहौलमध्ये ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला आहे. त्यामुळे एकजण बेपत्ता झाला आहे. तर चंबा येथे पुरामुळे एक व्यक्ती बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे. (Four dead, many missing due to cloudburst in Kishtwar area of Jammu Kashmir)

संबंधित बातम्या:

आधी आसाम आणि आता कर्नाटक, भाजपात आलेल्यांना अच्छे दिन, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी बोम्मईचं नाव

Rahul Gandhi : मी शेतकऱ्यांचा संदेश घेऊन आलोय, राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत

Karnataka CM BS Yediyurappa Resigns | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा

(Four dead, many missing due to cloudburst in Kishtwar area of Jammu Kashmir)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.