AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी आसाम आणि आता कर्नाटक, भाजपात आलेल्यांना अच्छे दिन, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी बोम्मईचं नाव

इतर पक्षातून भाजपात आलेला नेता, तेही दहा ते बारा वर्षात थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची ही दुसरी वेळ आहे. आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हे काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत. त्यानंतर आता कर्नाटकातही तसच घडताना दिसतंय

आधी आसाम आणि आता कर्नाटक, भाजपात आलेल्यांना अच्छे दिन, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी बोम्मईचं नाव
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 10:17 PM
Share

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बस्वराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. केंद्रीय निरिक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी बंगळुरुत ही घोषणा केली. बस्वराज बोम्मई हे लिंगायत ह्या कर्नाटकातल्या बहुल समाजातूनच येतात. ते सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय समजले जातात. खुद्द येडियुरप्पांनीच त्यांचं नाव पक्षश्रेष्ठींना सुचवलं आणि त्यावर कर्नाटकात शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतंय.

बस्वराज बोम्मई हे आधी जलसंपदा मंत्री आणि नंतर कर्नाटकच्या गृहमंत्रीपदी राहीले. आता त्यानंतर ते थेट मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. विशेष म्हणजे बस्वराज बोम्मई हे कर्नाटकचेच माजी मुख्यमंत्री एस.आर.बोम्मई यांचे पूत्र आहेत. म्हणजेच आधी वडील आणि नंतर मुलगाही मुख्यमंत्री होण्याची कर्नाटकातली ही दुसरी वेळ आहे. त्यांच्या आधी एच.डी.देवेगौडा आणि एच.डी. कुमारस्वामी हे दोघे वडील-मुलगा मुख्यमंत्रीपदी राहीले.

कोण आहेत बस्वराज बोम्मई? बस्वराज बोम्मई हे भाजपात वेगानं वर गेलेल्या नेत्यांपैकी एक मानले जातात. म्हणजेच बोम्मईंनी राजकीय करिअरची सुरुवात ही जनता दलातून केली. त्यानंतर ते 2008 साली भाजपात आले. नंतर विधान परिषदेवर दोन वेळेस आमदार झाले. हावेरी जिल्ह्यातल्या शिगगाव विधानसभेचं ते सध्या प्रतिनिधीत्व करतात. आधी येडियुरप्पा सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा खात्याचा कारभार सांभाळला तर नंतर ते थेट गृहमंत्रीपदी विराजमान झाले. त्यातून आता ते मुख्यमंत्री असतील. इतर पक्षातून भाजपात आलेला नेता, तेही दहा ते बारा वर्षात थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची ही दुसरी वेळ आहे. आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हे काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत. त्यानंतर आता कर्नाटकातही तसच घडताना दिसतंय

भाजपचं नेतृत्वबदलाचं नवं धोरण गेल्या काही काळात भाजपानं अनेक राज्यात नेतृत्वबदल केलेला दिसतोय. त्यात उत्तराखंडमध्ये तिरथसिंह रावत यांना बदलून धामींना मुख्यमंत्री केलं. आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल यांना बदलून काँग्रेसमधून आलेले हेमंत बिस्व सरमा यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. बिहारमध्ये सुशीलकुमार मोदींना पुन्हा भाजपनं संधी दिली नाही. उत्तर प्रदेशातही नेतृत्वबदलाच्या चर्चा रंगल्या पण योगींसमोर दिल्ली हायकमांडचं फारसं काही चाललं नाही.

(Who is basavraj bommai appointed as the next chief minister of karnataka)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.