उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय. येथे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे अनेक रस्ते बंद झाले.
Aug 01, 2021 | 7:35 AM
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय. येथे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे अनेक रस्ते बंद झाले.
1 / 6
या फोटोत हिमाचल प्रदेशच्या किन्नोरची भयानक स्थिती पाहता येईल. तेथे डोंगराचा कडा कोसळून एक पूलच उद्ध्वस्त झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.
2 / 6
यंदा हिमाचल प्रदेशमधील मान्सूनने अनेकांचे जीव घेतलेत. मागील काही दिवसात हिमाचलच्या लाहोल स्पीति आणि कुल्लूमध्ये ढगफुटी झालीय. त्यात 9 जणांचा मृत्यू झाला. अनेकजण बेपत्ता झालेत.
3 / 6
जम्मू-काश्मीरच्या किश्तवारमध्ये देखील ढगफुटी झाली. त्यानंतर जवळपास 20 लोक बेपत्ता आहेत.
4 / 6
महाराष्ट्रातही मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. त्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. हा फोटो रत्नागिरीतील पूरस्थितीचा आहे.
5 / 6
गुरुग्राममध्ये देखील जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांचं रुपांतर तलावांमध्ये झालं. अनेक घरांमध्ये पाणी घुसलं. दिल्लीच्या जवळील सायबर सिटीच्या पॉश एरियातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालं.