ते आले, घंटा बडवली आणि परतले, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By:

Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

मुंबई : ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असेल, यासह विविध राजकीय विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना प्रश्न विचारले असता, त्यांनी भाजप, विश्व हिंदू परिषद आणि विशेषत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राम मंदिर हा लोकांचा मुद्दा नाहीय, असेही राज […]

ते आले, घंटा बडवली आणि परतले, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र मंथन’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असेल, यासह विविध राजकीय विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना प्रश्न विचारले असता, त्यांनी भाजप, विश्व हिंदू परिषद आणि विशेषत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राम मंदिर हा लोकांचा मुद्दा नाहीय, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंना टोला

जनमानसाच्या मनाचा कानोसा घेतलात, तर कळेल, राम मंदिर हा लोकांचा मुद्दा नाहीय, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच, उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उद्देशून राज ठाकरे म्हणाले, “ते आले, घंटा बडवली आणि परतले.”

परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय म्हणाले?

चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रात राहिलात, वागलात, तर ठोकून काढणारच, मग उत्तर प्रदेशातील माणूस असो किंवा मराठी माणूस असो, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. “माझा जो परप्रांतियांचा मुद्दा आहे, तो जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने आहे. परप्रांतीय लोक इथेही मतदान करतात आणि तिकडे जाऊनही मतदान करतात परप्रांतीयांमुळे इथले लोक सोईसुविधांपासून वंचित राहतात.”, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, परप्रांतीयांना होणाऱ्या मारहाणीबाबत राज ठाकरे म्हणाले, “निवेदनातून प्रश्न सुटत नाहीत, मग कोणता मार्ग पत्कारायचा, हे तुम्हीच सांगा.”

“मराठीचा मुद्दा हा माझा आतला आवाज आहे. त्याला निवडणुकीचं लेबल लावू नका. जेव्हा निवडणुकीला सामोरं जाईन, तेव्हा इथल्या स्थानिक मुला-मुलींना काही मिळणार आहे की नाही, हा मुद्दा असेल. माझ्या मराठी मुला-मुलींच्या हक्काच्या गोष्टी बाहेरच्यांनी घेऊ नये.”, असे राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले.

राज ठाकरेंसोबतच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे :

– माझा जो परप्रांतियांचा मुद्दा आहे, तो जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने आहे – राज ठाकरे – परप्रांतिय लोक इथेही मतदान करतात आणि तिकडे जाऊनही मतदान करतात – राज ठाकरे – इथल्या हॉस्पिटलमध्ये बाहेरचे लोक उपचार घेणार असतील, तर इथल्या लोकांचं काय? – राज ठाकरे – परप्रांतियांमुळे इथले लोक सोईसुविधांपासून वंचित राहतात – राज ठाकरे – निवेदनातून प्रश्न सुटत नाहीत, मग कोणता मार्ग पत्कारायचा, हे तुम्हीच सांगा – राज ठाकरे – भाजपचे लोक राहुल गांधींना आतापर्यंत पप्पू-पप्पू करत होते, आता त्याच पप्पूचा परमपूज्य झालाय – राज ठाकरे – नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा पराभव गुजरात विधानसभा निवडणुकीत झालाय – राज ठाकरे – नोटाबंदी आणि जीएसटी या गोष्टी लोकांना आवडल्या नाहीत, त्याचा परिणाम पाच राज्यात दिसला – राज ठाकरे – राफेलवरुन कोर्टाने मोदी सरकारला क्लीन चिट दिलेली नाही – राज ठाकरे – ज्याच्या कंपनीला विमान बनवण्याचा एक तासाचा अनुभव नाही, त्याला कंत्राट का? – राज ठाकरे – साडेचार वर्षात नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. असे का? लोकांना सामोरं जात नाहीत, म्हणजे काळेबेरे आहे – राज ठाकरे – कन्हैया कुमार, हार्दिक पटेल हे ज्या प्रकारे बोलत आहेत, मुद्दे मांडत आहेत, ते उत्तम आहे – राज ठाकरे – भाजपची आता हवा गेलीय, निवडणुकीत भाजपकडून लोक पैसे घेतील, पण मत देणार नाहीत – राज ठाकरे – मोदी कुणाचेच ऐकत नाहीत आणि कुणाचेही न ऐकता राज्य चालवता येत नाहीत – राज ठाकरे – चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रात राहाल, मग यूपीचे असो किंवा मराठी असोत, ठोकून काढणारच – राज ठाकरे – आपली कामं सांगता येत नाहीत, तेव्हा राम मंदिरासारखी भावनिक मुद्दे काढावी लागतात – राज ठाकरे – जनमानसाच्या मनाचा कानोसा घेतलात, तर कळेल, राम मंदिर हा लोकांचा मुद्दा नाहीय, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला – आपली कामं सांगता येत नाहीत, तेव्हा राम मंदिरासारखी भावनिक मुद्दे काढावी लागतात – राज ठाकरे

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI