AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आत्मचरित्राची पानं वाढली”, ‘एमएसईबी’ कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

पुण्यातील शिरुरमध्ये असलेले 'एमएसईबी'चे कार्यालय फोडल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

आत्मचरित्राची पानं वाढली, 'एमएसईबी' कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 30, 2020 | 11:13 AM
Share

पिंपरी चिंचवड : वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करताना ‘एमएसईबी’चे कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचे कौतुक करताना “आत्मचरित्राची पानं वाढली” असे उद्गार राज ठाकरेंनी काढले. (Raj Thackeray calls Shirur MNS Volunteer who protest at MSEB office against excessive electricity bill)

पुण्यातील शिरुरमध्ये असलेले ‘एमएसईबी’चे कार्यालय फोडल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. बारा दिवसानंतर त्यांची सुटका झाल्यावर राज ठाकरे यांनी मनसैनिक सुशांत कुटे यांना फोन केला.

काय झाला संवाद?

राज ठाकरे : जय महाराष्ट्र सुशांत कुटे : जय महाराष्ट्र, ते आंदोलन झालं, रविवारी सुटलो आम्ही राज ठाकरे : बरं, चला अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं सुशांत कुटे : नांदगावकर साहेबांनी खूप मदत केली, घरच्यांना फोन वगैरे केला, सगळ्यांशी बोलले राज ठाकरे : हो न? सुशांत कुटे : हो, आणि तुमचंही लक्ष होतं, त्यांनी सांगितलं.. गणपतीमुळे काय भेट नाही झालं राज ठाकरे : काय त्रास नाही न झाला? सुशांत कुटे : नाही साहेब, त्रास नाही झाला, बारा दिवस लागले तिथे फक्त राज ठाकरे : हा ते ठीक आहे, आत्मचरित्राची पानं वाढली सुशांत कुटे : हाहाहा, तुमचा आशीर्वाद आहे साहेब. बाकी काय राज ठाकरे : शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना सुशांत कुटे : गणपती झाल्यावर भेटायला येतो राज ठाकरे : हो या

लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलावरोधात मनसे आक्रमक झाली आहे. राज्याच्या अनेक भागात मनसेने आंदोलन छेडले आहे. कुठे वीज वितरणाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे, तर कुठे फलकांना काळे फासण्यात आले आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुनील ईरावर यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेने खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेही अस्वस्थ झाले. राज ठाकरे यांनी सुनील ईरावर याच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी बोलताना सुनील यांचे बंधू अनिल ईरावर यांनी अक्षरशः हंबरडा फोडला.

संबंधित बातम्या :

मी स्वत: घरी येईन भेटायला, मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचा फोन, भावाच्या अश्रूंचा बांध फुटला

(Raj Thackeray calls Shirur MNS Volunteer who protest at MSEB office against excessive electricity bill)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...