Raj Thackeray : राज ठाकरे वैफल्यग्रस्त, अयोध्येत जाण्यापासून कोणी रोखलं?, संजय राऊतांनी सभेनंतर पुन्हा राज यांना डिवचले

Raj Thackeray : राज ठाकरे वैफल्यग्रस्त, अयोध्येत जाण्यापासून कोणी रोखलं?, संजय राऊतांनी सभेनंतर पुन्हा राज यांना डिवचले
राज ठाकरे वैफल्यग्रस्त, अयोध्येत जाण्यापासून कोणी रोखलं?, संजय राऊतांनी सभेनंतर पुन्हा राज यांना डिवचले

अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राज यांना डिवचलं आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा भाजप पुरस्कृत होता. उत्तर प्रदेशातही भाजपचे सरकार आहे. त्यांना अयोध्येत जाण्यापासून कुणी अडवलं? कोण त्यांच्यावर केसेस करणार असा प्रतिसवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 22, 2022 | 3:11 PM

मुंबई : आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वादळी सभा घेत मुख्यमंत्र्यांपासून (Cm Uddhav Thackeray) ते शरद पवारांपर्यंत (Sharad Pawar) पुन्हा सर्वांचा समाचार घेतला. तसेच हिंदुत्वावरूनही त्यांनी पुन्हा शिवसेनेला टार्गेट केले. मात्र आता त्यावर शिवसेना नेते जोरदार पलटवार करत आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राज यांना डिवचलं आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा भाजप पुरस्कृत होता. उत्तर प्रदेशातही भाजपचे सरकार आहे. त्यांना अयोध्येत जाण्यापासून कुणी अडवलं? कोण त्यांच्यावर केसेस करणार असा प्रतिसवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे. राज ठाकरेंनी हा ट्रॅप असल्याचे म्हणत कार्यकर्त्यांना अडकवू देणार नाही म्हणत हा दौरा स्थगित केल्याचे सांगितले मात्र आता हा ट्रॅप नेमका कुणाचा होता असा सवाल आता राजकारणात विचारण्यात येत आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले,  तुम्हाला कोणी विरोध करत आहे तर झुगारुन जावा, तुम्ही नेता आहात कोणी एक खासदार विरोध करतो तर एक भूमिका घ्या. तुम्ही दौराच रद्द केला आहे, असे म्हणत राऊतांनी डिवचलं आहे. तर उद्धव ठाकरे आमच्या पार्टीचे सेनापती आहेत आमच्यावर जेवढ्या केसेस आहेत तेवढ्या त्यांच्या पार्टीवर नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला.

औरंगजेबाची कबर तोडून टाका

तसेच राज्यात अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवून गेल्यापासून त्यावरूनही राजकारण तापलं आहे. राज ठाकरे यांनी सभेतून यावरून सरकारवर हल्लाबोल चढवला त्यालाही संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. औरंगजेबाची कबर आज आहे का? आमच्य़ा सरकारला दोन वर्ष झाली. औरंगदेबची कबर जी आहे ती केद्रं सरकारच्या हातामध्ये आहे, तोडून टाका ना, असेही राऊत म्हणाले, तसेच राज ठाकरे हे नवे एमआयएम आहेत. हिंदूत्ववादी ओवैसी आणि ते हैदराबादचे औवेसी हे सेम आहेत, असा टोला राऊतांनी पुन्हा लगावला आहे.

यांना उपचाराची गरज

राज ठाकरे निराशेने ग्रासले की असे बोलतात इतर दुकानं चालली नाही म्हणून सोयीनुसार हे करत आहेत. राज ठाकरे कधी झाले हिंदुत्ववादी? आमच्या हिंदुत्वाला ढोंगी वैगरे बोलणार
ह्यांनी शाल कधी पांघरली? आमच्या हिंदुत्वावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही.  त्यांना काउंसलिंगची गरज आहे उपचाराची गरज आहे, असेही राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें