AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : पक्षाशी बांधिलकी काय असते याचा हा वस्तुपाठ, राज ठाकरेंकडून फडणवीसांच्या निर्णयाचं स्वागत, उपमुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा

आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या सविस्तर शुभेच्छा या फडणवीसांचं कौतुक करणाऱ्या आहेत. तसेच यात ते वाटलं होतं. पुन्हा याल पण तसं झालं नाही, असेही म्हणाले आहेत.

Raj Thackeray : पक्षाशी बांधिलकी काय असते याचा हा वस्तुपाठ, राज ठाकरेंकडून फडणवीसांच्या निर्णयाचं स्वागत, उपमुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा
पक्षाशी बांधिलकी काय असते याचा हा वस्तुपाठ, राज ठाकरेंकडून फडणवीसांच्या निर्णयाचं स्वागत, उपमुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छाImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jul 01, 2022 | 4:12 PM
Share

मुंबई : कालच नव्या मुख्यमंत्री (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांचा (Devendra Fadnavis) शपथविधी पार पडलाय. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छावर्षाव होत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या सविस्तर शुभेच्छा या फडणवीसांचं कौतुक करणाऱ्या आहेत. तसेच यात ते वाटलं होतं. पुन्हा याल पण तसं झालं नाही, असेही म्हणाले आहेत. राज्यात अडीच वर्षांनतर सर्वात मोठं एक सत्तांतर झालं. ज्यात ठाकरे सरकार हे कोसळलं तर एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं युतीचं सरकार आलं. त्यानंतर आता नव्या सरकारवर राजकीय प्रतिक्रिया तसेच शुभेच्छाही भरभरून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे सतत भाजप नेत्यांचं कौतुक कर आहे. त्यांनी गुढी पाडव्याच्या सभेतही ठाकरे सरकारच्या स्थापनेवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर काल फडणवीस हे पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरेंचं पत्र जसच्या तसं

प्रिय देवेंद्रजी,

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…

तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

आता जरा आपल्यासाठी

ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

राज ठाकरे यांचं ट्विट

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट