Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या, राज्यातल्या जनतेच्या हिताचे निर्णय घेणार; रखडलेले प्रकल्पही मार्गी लावणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

त्यात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार. 170चे बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे त्याविषयी कोणतीही शंका नाही. उद्या सर्व आमदार मुंबईत येतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या, राज्यातल्या जनतेच्या हिताचे निर्णय घेणार; रखडलेले प्रकल्पही मार्गी लावणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही
पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 4:00 PM

मुंबई : शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांच्या तसेच राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राज्य कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. ते गोव्यात बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडला पाहिजे, त्यांचे जीवन सुखी, समृद्ध झाले पाहिजे, यासाठी राज्य सरकार आजच्या दिवशी संकल्प करत आहे, की महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त (Farmers suicide) झाला पाहिजे. आजच्या कृषी दिनाच्या निमित्ताने हाच राज्य सरकारचा संकल्प आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बाळासाहेबांचे हिंदुत्व (Hindutva) आणि दिघे साहेबांची शिकवण आम्ही पुढे नेत आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी बहुमत आमच्याकडे आहे, त्यामुळे चिंता नाही, असेही म्हटले आहे.

‘गतीमान सरकार देण्यास प्राधान्य’

राज्यातले विकास प्रकल्प मार्गी लावणे, त्यांना चालना देणे यासाठी आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्प असतील, जलयुक्त शिवार, मेट्रोचे प्रकल्प, जलसंपदा विभागाचे रखडलेले प्रकल्प या माध्यमातून जमीन मोठ्या प्रमाणात हस्तांतरित होईल, जमीन सिंचनाखाली येईल. या सर्वांचा फायदा शेतकऱ्यांना होईल. या सगळ्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमचे सहकारी याला गती देणार आहोत. राज्याच्या विकासामध्ये गतीमान सरकार आणि राज्याला विकसित करण्यासाठी जे जे काही करता येईल, ते सर्व राज्य सरकार करणार आहे.

हे सुद्धा वाचा

‘आमच्याकडे बहुमत’

मी आता मुंबईला जाणार आहे. मुंबईत सध्या प्रचंड पाऊस पडत आहे. यावरच्या उपाययोजनांविषयी आयुक्तांशी बोलणे झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून काम सुरू आहे. दरम्यान, 3 आणि 4 तारखेला अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार. 170चे बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे त्याविषयी कोणतीही शंका नाही. उद्या सर्व आमदार मुंबईत येतील, अशी माहिती त्यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर विचारले असता, त्यांनी यावेळी उत्तर देणे टाळले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.