Raj Thackeray : राज ठाकरेंचा पत्राद्वारे मनसे सैनिकांना नवा आदेश, भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे, पत्राद्वारे घराघरात पोहोचा

आता राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना पत्राद्वारे नवे आदेश दिले आहे. भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यामुळे पत्राद्वारे घराघरात पोहोचा, त्याशिवाय आंदोलन यशस्वी होणार नाही, असे पत्र राज ठाकरे यांनी कार्यकर्तांना लिहिले आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पत्राद्वारे मनसे सैनिकांना नवा आदेश, भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे, पत्राद्वारे घराघरात पोहोचा
राज ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
दादासाहेब कारंडे

|

Jun 02, 2022 | 5:25 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गेल्या काही दिवसांपासून मशीदीवरील भोंग्याविरोधात (Loudspeaker Row) रणशिंग फुंकलं आहे. कित्येक वेळा अजानच्या वेळी हनुमान चालीसाही (Hanuman Chalisa) चालवण्यात आली. यावरून बराच वाद रंगला मात्र आता राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना पत्राद्वारे नवे आदेश दिले आहे. भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यामुळे पत्राद्वारे घराघरात पोहोचा, त्याशिवाय आंदोलन यशस्वी होणार नाही, असे पत्र राज ठाकरे यांनी कार्यकर्तांना लिहिले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या ब्रेकनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंदाच्या गुढी पाडव्याची सभा ही शिवतिर्थावर पार पडली. याच सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाची भूमिका उचलून धरत मशीदीवरील भोंगे उतरलेच पाहिजेत, अशी भूमिका घेतली. तसेच ज्या मशीदीवर लाऊडस्पीकरवर अजान होईल तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असे आदेशही काढले.

राज ठाकरे यांचं पत्र जसच्या तसं

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

मशिर्दीवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.

तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही.

मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही. अशा आशयाचे पत्र त्यांनी कार्यकर्त्यांना आता पाठवलं आहे.

राज ठाकरेंची मूळ पोस्ट

महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी

राज्यात एकिकडे कोरोना वाढतोय तर दुसरीकडे महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबतही मनसेची बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीचा रोडमॅपही दिला आहे. त्यातच घराघरापर्यंत पोहोचून लेटरद्वारे मनसेची भूमिका लोकांना पटवून देणे हेही सांगितले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या आदेशाने त्यांचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. या सगळ्याचा मनसेला निवडणुकीत किती फायदा होतो. हे निवडणुकीनंतरच कळेल. मात्र सध्या तरी मशीदीवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालीसाने वातावरण तापलं आहे. याच मुद्यावरून काहीजण राज ठाकरेंचं समर्थन करत आहेत. तर महाविकास आघाडी यावर सडकून टीकाही करत आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें