राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भरसभेत टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट दाखवला

राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भरसभेत टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट दाखवला


पनवेल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचा झंझावात सुरु आहे. मुंबईत काळाचौकी आणि भांडूपमधील सभेनंतर राज ठाकरेंची पनवेलमध्ये सभा पार पडली. या सभेत त्यांनी अटलजींच्या अंत्ययात्रेतील गर्दी मोदी-शाहांनी प्रचार रॅली म्हणून व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची पोलखोल केली. नरेंद्र मोदी यांच्या एका प्रचार रॅलीत सर्मथकांची रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हा व्हिडीओ खोटा असल्याची पडताळणी टीव्ही 9 मराठीने केली होती. हाच स्पेशल रिपोर्ट राज ठाकरे यांनी भरसभेत दाखवला.

पाहा व्हिडीओ :

टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट काय ? 

गुजरातमध्ये नरेंद्र मोदींची जबरदस्त हवा आहे असे म्हणत त्यांच्या उमेदवारी अर्ज रॅलीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या फोटोवरुन पुन्हा एकदा गुजरातमध्ये नरेंद्र मोदी निवडून येणार असल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओत नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये प्रचार रॅली आयोजित केली आहे. या  रॅलीचे नेतृत्व नरेंद्र मोदी करत असून त्यांच्या बाजूला भाजप अध्यक्ष अमित शाहाही दिसत आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या या सभेत मोदी समर्थकांची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळत आहे. यावरून पुन्हा एकदा मोदी सत्तेत येणार असल्याचा दावा सर्मथकांकडून केला जातोय.

हा व्हिडीओ खरा की खोटा याबाबतची सत्यता पडताळण्यासाठी टीव्ही 9 मराठीने गुगल रिवर्सचा वापर केला.  त्यावेळी टीव्ही 9 मराठीसमोर धक्कादायक वास्तव्य समोर आले. गुगल रिवर्सचा वापर केल्यानंतर हे सर्व फोटो 17 ऑगस्ट 2018 असल्याचे समजलं. विशेष म्हणजे हे सर्व फोटो भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतरच्या अंत्ययात्रेचे होते. मात्र काही लोकांना अटलजींच्या अंत्ययात्रेचे व्हिडीओ आणि फोटोची मोडतोड करत नरेंद्र मोदींच्या रॅलीचा नवा व्हिडीओ तयार केला. त्यामुळे हा व्हिडीओ खोटा असल्याचे टीव्ही 9 मराठी सांगितले.

राज ठाकरेंनी भरसभेत टीव्ही 9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट दाखवला

राज ठाकरे यांनी पनवेलच्या सभेत हाच व्हिडीओ दाखवत मोंदीच्या आयटी सेलची पुन्हा एकदा पोलखोल केली. याआधीही त्यांनी सोलापूरमधील एका सभेत टीव्ही 9 मराठीचा हरिसाल गावातील ग्राऊंड रिपोर्ट दाखवला होता. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे देशातलं पहिलं डिजीटल गाव म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. पण या गावात सध्या काय परिस्थिती आहे हा ग्राऊंड रिपोर्ट टीव्ही 9 मराठीने केला होता. हाच ग्राऊंड रिपोर्ट राज ठाकरेंनी सोलापूरच्या सभेत दाखवल होता.

पाहा व्हिडीओ:

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI