Raj Thackeray : फडणवीसांना 2029 पर्यंत मुख्यमंत्री…भर कार्यक्रमात राज ठाकरेंचा मिश्कील टोला; एकच खसखस पिकली!

गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडी, सत्ताबदल, आमदारांची फोडाफोडी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊ शकतात अशी होत असलेली चर्चा राज ठाकरेंच्या विधानाचा आधार होता.

Raj Thackeray : फडणवीसांना 2029 पर्यंत मुख्यमंत्री...भर कार्यक्रमात राज ठाकरेंचा मिश्कील टोला; एकच खसखस पिकली!
RAJ THACKERAY AND DEVENDRA FADNAVIS
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 9:03 PM

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. गेल्या वर्षभरात राज्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. कर्जतमधील वृक्षतोडीवरून राजकारण पेटले आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले. ही बैठक होण्याआधी तिन्ही नेत्यांच बंद दारआड चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर होती, हे अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान, याच कार्यक्रमात राज ठाकरे यांनी केलेल्या मिश्कील विधानाची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

2029 सालापर्यंत मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं

एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हे तिन्ही नेते एकाच मंचावर आले होते. यावेळी पुस्तक प्रकाशनानंतर राज ठाकरे यांचे भाषण झाले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. राज ठाकरे यांच्या विधानाने एकच हशा पिकला. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनाही हसू आवरले नाही. “मला आशिष शेलार यांनी मला सांगितलं की मी बोलवलं की मुख्यमंत्री कार्यक्रमाला येतात. यापुढेही मी मुख्यमंत्र्यांना बोलवत जाईल जाईन, ते येत जातील. पण 2029 सालापर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं,” असं उपरोधिक विधान, राज ठाकरेंनी केलं.

Loading...

राज ठाकरेदेखील हसायला लागले

गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडी, सत्ताबदल, आमदारांची फोडाफोडी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊ शकतात अशी होत असलेली चर्चा राज ठाकरेंच्या विधानाचा आधार होता. राज ठाकरेंनी हे विधान करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. राज ठाकरे यांनीदेखील हसू आवरले नाही. भाषण थांबवून काही काळासाठी ते हसत होते.

कलाकारांना प्रोत्साहन देणं गरजेचं

दरम्यान राज ठाकरे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. पुढे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकाराचे महत्त्व, राज्यात कलेचे महत्त्व यावर भाष्य केलं. सोबतच त्यांनी कलेला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, कलाकारांचा योग्य सन्मान झाला पाहिजे असं मत व्यक्त केलं. सोबतच राज्य सरकार, सामान्य नागरिकांनाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us