राज ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या, अजित पवार म्हणतात, जरुर, पण एकच अट !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 12:02 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या, अजित पवार म्हणतात, जरुर, पण एकच अट !
अजित पवार आणि राज ठाकरे

मुंबई : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह (Marathwada Rain) राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांना भरघोस भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जर 50 हजार रुपये केंद्रानं राज्य आपत्ती निधीतून द्यायला सांगितले असेल तर ते देता येईल, कारण केंद्राकडूनच हा निधी दिला जातो. केंद्र सरकारनं दुजाभाव करु नये. कारण आम्ही पैसे मागितले तर पैसे मिळत नाही. पण काही राज्यांना पैसे न मागता दिले जातात हे अयोग्य आहे. असं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार काय म्हणाले?

वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी मागणी केली जातेय. पण महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेत. प्रत्येक पालकमंत्री त्या त्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. अडचणीतील माणसाला मदत करायचं‌ काम सुरु आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

तलावातला गाळ जिथं कँचमेंट एरिया आहे तिथं टाकला जाऊ नये. आता संकट आहे त्यामुळं त्यावर चर्चा करता नंतर करता येईल, असं अजित पवार म्हणाले.

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 50 हजार तातडीने द्या : राज ठाकरे

कधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. आता ‘गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे

VIDEO : अजित पवार नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या   

शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा, भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं, ठाकरे सरकारला महत्त्वाचा सल्ला!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI