मनसेचं महाअधिवेशन नेमकं कसं असेल?

राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या (MNS Mahaadhiveshan) जन्मदिनी होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु आहे.

  • Publish Date - 6:41 pm, Wed, 22 January 20
मनसेचं महाअधिवेशन नेमकं कसं असेल?

मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या (MNS Mahaadhiveshan) जन्मदिनी होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत (MNS Mahaadhiveshan) येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी 9 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होईल. यावेळी मनसेचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.

मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असणार आहे. यावर सोनेरी रंगाच्या षटकोणात राजमुद्रेप्रमाणे महाराष्ट्र धर्म लिहिलं असल्याची शक्यता आहे. सुलेखनकार अच्युत पालव यांनी हे डिझाईन केले आहे. मात्र राजमुद्रेला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. त्यामुळे मनसेचा नवा झेंडा नेमका कसा असणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

एग्जिबिशन सेंटर हॉल नंबर 1 इथे राज ठाकरे यांची सभा होईल. या सभेपूर्वी पोलिसांनी आजपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. या हॉलची साफ-सफाई आणि भव्य स्टेज बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. राज्यभरातून 20 ते 30 हजार मनसैनिक या अधिवेशनाला येण्याची शक्यता आहे.

मनसेच्या महाअधिवेशनाची प्राथमिक माहिती 

पहिलं सत्र 9 ते 1 

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते महाअधिवेशनाचा उद्घाटन सोहळा. यावेळी मनसेचा नवीन झेंडा आणि मनसेची नवीन दिशा (टॅगलाईन ) अनावरण
  • प्रमुख वक्ते आणि नेते यांची भाषण

विविध विषयांवर पक्षाची काय भूमिका असली पाहिजे, त्याबाबत ठराव मांडले जातील. प्रत्येक ठराव मांडण्याची जबाबदारी एका एका नेत्यावर दिली आहे. याला सूचक- अनुमोदन दिलं जाईल. ( उदा- शिक्षण या विषयावर पक्षाची भूमिका काय हे जाहीर केलं जाईल )

भोजन 1 ते 2.30 

दुसरं सत्र –

  • प्रमुख वक्ते आणि नेते भाषण

चहापान 5 वाजता 

तिसरे सत्र 

  • राज ठाकरे यांचं भाषण, पक्षाची नवी दिशा, भूमिका, पक्षबांधणी, पक्षाचा नवीन झेंडा याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील.
  • राज ठाकरे यांच्या भाषणानंतर महाअधिवेशनाचा समारोप होईल.

संबंधित बातम्या  

मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं अधिकृत लाँचिंग?

एकीकडे उद्धव ठाकरेंचा शपथविधी, दुसरीकडे अमित ठाकरेंचा पहिलाच मोर्चा