राज ठाकरे की नरेंद्र मोदी, महाराष्ट्रातील पाडव्याच्या सभा कोण गाजवणार?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई: महाराष्ट्रात आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिग्गजांच्या जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची, तर दुसरी सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होत आहे. मनसेच्या पाडवा मेळाव्यानिमित्त राज ठाकरेंची जाहीर सभा मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर होत आहे. त्यासाठी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी चलो शिवतीर्थ असा नारा दिला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र […]

राज ठाकरे की नरेंद्र मोदी, महाराष्ट्रातील पाडव्याच्या सभा कोण गाजवणार?
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिग्गजांच्या जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची, तर दुसरी सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होत आहे. मनसेच्या पाडवा मेळाव्यानिमित्त राज ठाकरेंची जाहीर सभा मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर होत आहे. त्यासाठी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी चलो शिवतीर्थ असा नारा दिला आहे.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपची प्रचारसभा घेणार आहेत. महाराष्ट्रातील नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होत आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या या सभेबाबत नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुनही माहिती दिली.

“गुढीपाडव्याच्या पवित्रदिनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भेटीचा योग येतोय ! नांदेडमध्ये आज संध्याकाळी आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. महाराष्ट्राचे आशीर्वाद नेहमीच आम्हाला मोठे बळ देतात”, असं ट्विट मोदींनी आज केलं.

राज ठाकरे काय बोलणार?

मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपावर तुफान टीकास्त्र सोडले होते. 19 मार्चच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्येही राज यांनी लोकसभा लढवणार नसल्याचं सांगत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना राजकीय पटलावरुन बाजूला करा, येत्या निवडणुकीत भाजपाला मतदान करु नका, असा प्रचार कार्यकर्त्यांनी करावा असं आवाहन केलं होतं. त्यानंतर येणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात आपण बोलू असं सांगितलं होतं.

त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी विविध जिल्ह्यात सभा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याबाबत राज ठाकरे आज अधिकृत घोषणा करतात का हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या 

राजू शेट्टींसाठी राज ठाकरेंची तोफ कोल्हापुरात धडाडणार

विदर्भात उद्धव ठाकरेंच्या 4 सभा, भाजपसाठी एकही नाही!  

विश्वनाथ पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ  

राजू शेट्टींसाठी राज ठाकरेंची तोफ कोल्हापुरात धडाडणार   

मोदींविरोधात राज ठाकरेंचा प्रचार, आघाडीला मनसेची साथ