राजू शेट्टींसाठी राज ठाकरेंची तोफ कोल्हापुरात धडाडणार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात न उतरताही मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सज्ज झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 9 ते 10 उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचारसभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्यासाठीही राज ठाकरे कोल्हापूरच्या मैदानात उतरणार आहेत. येत्या 18 किंवा 19 एप्रिल […]

राजू शेट्टींसाठी राज ठाकरेंची तोफ कोल्हापुरात धडाडणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात न उतरताही मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सज्ज झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या 9 ते 10 उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचारसभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्यासाठीही राज ठाकरे कोल्हापूरच्या मैदानात उतरणार आहेत.

येत्या 18 किंवा 19 एप्रिल रोजी राज ठाकरे राजू शेट्टींच्या हातकणंगले जागेसाठी कोल्हापुरात सभा घेणार आहेत. या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे आणि राजू शेट्टी पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावर एकत्र दिसतील. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाआघाडीतील घटकपक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निवडक उमेदवारांसाठी सभे घेत असताना, राज ठाकरे हे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठीही कोल्हापूरच्या मैदानात उतरणार आहेत.

राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मैदानात, ‘या’ 9 जणांसाठी सभा घेणार : सूत्र

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यभर कार्यकर्ते आहेत. तसेच, राज ठाकरे यांचा वैयक्तिक करिष्मा सुद्धा मोठा आहे. राज ठाकरेंची भाषणं ऐकण्यासाठी आणि त्या भाषणांमधून प्रभावित होणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. याचा फायदा हातकणंगलेत राजू शेट्टींना होण्याची शक्यता आहे. खरेतर, हातकणंगले हा राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला आहे. तेथून शेट्टी विजयी होतील, असा अनेक सर्वेक्षणांनीही अंदाज वर्तवला आहे. मात्र, राज ठाकरेंच्या सभेने राजू शेट्टींचा विजय आणखी मोठा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी राज ठाकरे प्रचारसभा घेणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारासाठी 9 सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह 9 उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचाराच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

  1. सोलापूर – सुशील कुमार शिंदे (काँग्रेस)
  2. नांदेड – अशोक चव्हाण (काँग्रेस)
  3. सातारा – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
  4. बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
  5. मावळ – पार्थ पवार (राष्ट्रवादी)
  6. उत्तर मुंबई – उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)
  7. ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)
  8. नाशिक – समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
  9. रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी)

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात यासंबंधी अधिकृत घोषणा केली. मात्र, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार यांच्याविरोधात राज्यभर प्रचारसभा घेणार असल्याचेही राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, उमेदवार उभे केले नसताना, राज ठाकरे कुणासाठी प्रचार करणार, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर आघाडीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे सभा घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.