विदर्भात उद्धव ठाकरेंच्या 4 सभा, भाजपसाठी एकही नाही!

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विदर्भात एकूण चार सभा होणार आहेत. विशेष म्हणजे, एकही सभा भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतली जाणार नाही. उद्धव ठाकरे विदर्भात रामटेक, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा अशा चार लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. या चारही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभा होणाऱ्या मतदारसंघात कोण उमेदवार? रामटेक – कृपाल तुमाणे …

विदर्भात उद्धव ठाकरेंच्या 4 सभा, भाजपसाठी एकही नाही!

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विदर्भात एकूण चार सभा होणार आहेत. विशेष म्हणजे, एकही सभा भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतली जाणार नाही. उद्धव ठाकरे विदर्भात रामटेक, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा अशा चार लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. या चारही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या सभा होणाऱ्या मतदारसंघात कोण उमेदवार?

  • रामटेक – कृपाल तुमाणे
  • यवतमाळ – भावना गवळी
  • अमरावती – आनंदराव अडसूळ
  • बुलडाणा – प्रतापराव जाधव

राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कुठे संयुक्त, तर कुठे स्वतंत्र सभा घेण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना युतीच्या उमेदवारांकडून जास्त मागणी आहे. कारण त्यांच्या सभांचा प्रभाव जनतेवर पडतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विदर्भात केवळ शिवसेनेच्या उमेदवारांसाठीच सभा घेण्याचे ठरवले आहे.

येत्या 7 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभेच्या प्रचारासाठी राज्यभर दौरा करुन, ठिकठिकाणी सभा घेणार आहेत. त्यासंदर्भात संपूर्ण वेळापत्रक शिवसेनेकडून जाहीर करण्यात आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचा वेळापत्रक :

 

 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *