…तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं, भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं. भाजपच्या एका बड्या नेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

...तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं, भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 10:41 PM

अभिजीत पोते, पुणे : शरद पवार यांच्या पुढाकराने महाराष्ट्रात इतिहासात घडला. शिवसेना आणि काँग्रेस दोन वेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर (Eknath Shinde) हे सरकार पडलं. हे सरकार कश्यामुळे पडलं यासाठी विविध तर्क लावले जात आहेत. कुणी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दोष देतंय, तर कुणी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणतंय. अश्यात भाजपच्या एका बड्या नेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते, माजी आमदार राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार पडलं नसतं. पण एका गोष्टीमुळे सरकार पडलं असल्याचं त्यांनी सांगितलंय.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मीडियासमोर आले असते तरी सरकार पडलं नसतं, असा दावा राम शिंदेंनी केलाय.

हे सुद्धा वाचा

राम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. ठाकरेंचं संतुलन बिघडलं आहे, असं त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे निराशेतून विधानं करतात. त्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असंही ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच मंत्रालयात गेले नाहीत. संघटनेची बैठक घेतली नाही. आता सरकार पडल्यानंतर ते खडबडून जागे झाले आहेत. बैठका घ्यायला लागलेत, असं शिंदे म्हणालेत.

ठाकरेंवर टीका करताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलंय. देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस के घोडे आहेत, असं राम शिंदे म्हणालेत.

राम शिंदे हे भाजपच्या वरच्या फळीतील नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. त्याच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.