रमेश आडसकरही मैदानात, बीडमधील दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट?

| Updated on: Sep 30, 2019 | 7:24 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः उमेदवारी जाहीर केल्यानंतरही नमिता मुंदडा (Namita Akshay Mundada BJP) यांनी भाजपात प्रवेश केला.

रमेश आडसकरही मैदानात, बीडमधील दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट?
Follow us on

बीड : भाजपकडून बीड जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगावचे आमदार आर. टी. देशमुख यांच्या जागी भाजप नेते रमेश आडसकर (Beed Ramesh Adaskar) यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे, तर केजमधून विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांचाही पत्ता कट होणार आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना तिकीट (Beed Ramesh Adaskar) दिलं जाण्याची शक्यता आहे.

सुरुवातीपासून भाजपात असलेले रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर ते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून 2009 ची लोकसभा निवडणूक लढले. पण पराभवानंतर आडसकर पुन्हा भाजपात आले. यावेळी माजलगाव मतदारसंघातून त्यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.

नमिता मुंदडा भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः उमेदवारी जाहीर केल्यानंतरही नमिता मुंदडा (Namita Akshay Mundada BJP) यांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या विरोधाला कंटाळून आपण भाजपात जात असल्याचं मुंदडा कुटुंबाने म्हटलं आहे. दिवंगत नेत्या विमलताई मुंदडा या दोन वेळा भाजपच्या आणि तीन वेळा राष्ट्रवादीच्या आमदार होत्या, तर नऊ वर्ष त्यांच्याकडे मंत्रीपदही होतं. शरद पवारांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. पुढे त्यांचा राजकीय वारसा मुलगा अक्षय आणि सून नमिता यांनी चालवला.

नमिता मुंदडा भाजपात आल्यामुळे संगिता ठोंबरे यांचं तिकीट कापलं जाणं निश्चित झालं आहे. ठोंबरे समर्थकांमध्ये यामुळे नाराजीचं वातावरण आहे.

संबंधित बातम्या :

गोपीनाथ मुंडेंना सोडून गेलेला एक-एक नेता पंकजा मुंडेंनी परत आणला

भाजप आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का, स्वपक्षातूनच जोरदार विरोध

बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या शिष्टाईलाही अपयश

राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार फुटला, शरद पवारांना धक्का!