भाजप आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का, स्वपक्षातूनच जोरदार विरोध

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून (Shevgaon-Pathardi  Assembly Constituency) भाजप आमदार मोनिका राजळे (BJP MLA Monika Rajale) यांना मोठा धक्का बसला आहे.

भाजप आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का, स्वपक्षातूनच जोरदार विरोध

अहमदनगर: शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून (Shevgaon-Pathardi  Assembly Constituency) भाजप आमदार मोनिका राजळे (BJP MLA Monika Rajale) यांना मोठा धक्का बसला आहे. या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मोनिका राजळेंना स्वपक्षातूनच मोठा विरोध (Internal conflicts in BJP Ahmednagar) होत आहे. “राजळे हटाव, भाजप बचाव” या घोषणांसह राजळे विरोधी मोहिमेला स्थानिक भाजपमध्ये वेग आला आहे. विशेष म्हणजे राजळेंना विरोध करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील पार पडला. यावेळी पंकजा मुंडे समर्थक (Supporter of Pankaja Munde) देखील राजळेंच्या विरोधात उतरले होते.

मागील 5 वर्षात अनेक ठिकाणी डावलून अपमानास्पद वागणूक दिली. त्याला वाच्या फोडण्यासाठीच सर्व मूळ भाजप आणि मित्र पक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचं मत संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे भाजप युवामोर्चाचे आणि पंकजा मुंडे समर्थक अमोल गर्जे, जिल्हापरिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते.

या मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे (Monika Rajale) विद्यमान आमदार आहेत. मागील वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात घुलेंचा पराभव झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *