Vinayak Mete: “3 तारखेचा विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग केवळ गैरसमजातून” कारमालक संदिप वीरची पोलिसांच्या चौकशीत माहिती

3 ऑगस्टला विनायक मेटे यांच्या गाडीचा अनोळखी व्यक्तींनी पाठलाग केल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. पण हा पाठलाग केवळ गैरसमजातून झाल्याचं या गाडीच्या मालकाने पोलिसात सांगितलं आहे.

Vinayak Mete: 3 तारखेचा विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग केवळ गैरसमजातून कारमालक संदिप वीरची पोलिसांच्या चौकशीत माहिती
विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या तपासाला वेग
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 18, 2022 | 8:21 AM

पुणे : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघाती मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मेटेंचा अपघात झाला की त्यांच्यासोबत घातपात झाला असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अश्यात 3 ऑगस्टला विनायक मेटे यांच्या गाडीचा अनोळखी व्यक्तींनी पाठलाग केल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. पण हा पाठलाग केवळ गैरसमजातून झाल्याचं या गाडीच्या मालकाने पोलिसात सांगितलं आहे. मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या गाडीच्या मालकाची रांजणगाव पोलीसांनी चौकशी केली. या चौकशीत कार मालक संदिप वीरनं तो पाठलाग केवळ गैरसमजातून झाला असल्याचं पोलिससांना सांगितलं आहे, अशी माहिती रांजणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे (Balawant Mandage) यांनी ही माहिती दिली आहे.

मेटेंच्या गाडीचा पाठलाग केलेली गाडी रांजणगाव पोलीस हद्दीतली होता. त्यामुळे बातम्या पाहिल्यानंतर त्या कारचा मालक आणि त्यादिवशी गाडीत असणारे लोक स्वत:हून पोलीस स्टेशनला आले. तेव्हा त्यांचे जबाब नोंदवले. तेव्हा कार मालक संदीप वीर यांनी सांगितलं की, त्यादिवशी माझ्या चुलत भावाचा वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही शिरुरला गेलो. पण काही मित्रांनी आग्रह केला की तुम्ही परत घरी या त्यामुळे आम्ही घाई घाईने परत निघालो. स्पीडमध्ये आम्ही येत होतो. काही गाड्यांना ओव्हरटॅक केलं. हॉर्न वाजवले म्हणून त्यांचा गैरसमज झालेला असू शकतो की आम्ही पाठलाग केला. पण आम्ही ते जाणून बुजून केलं नाही. तर ते अनावधानाने झालं, अशी माहिती रांजणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली आहे.

हे स्थानिक रहिवासी आहेत.भांबार्डे गावचे रहिवासी आहेत. त्यामुळे उद्या चौकशीसाठी बोलावलं गेलं तर ते हजर राहू शकतात, असंही मांडगे यांनी सांगितलं.

मेटेंचं अपघाती निधन

विनायक मेटे यांच्या 14 ऑगस्टला पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. मराठा समन्वय समितीची बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.