AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संकट आलं की केंद्राकडे बोट दाखवायचं हीच महाराष्ट्राची ओळख झालीय; रावसाहेब दानवेंनी फटकारले

रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधताना आघाडीला फटकारले आहे. (raosaheb danve slams maharashtra government over corona crisis)

संकट आलं की केंद्राकडे बोट दाखवायचं हीच महाराष्ट्राची ओळख झालीय; रावसाहेब दानवेंनी फटकारले
रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री
| Updated on: Apr 26, 2021 | 7:22 PM
Share

मुंबई: राज्यावर कोणतंही संकट आलं की केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी ढकलणं हीच आता महाराष्ट्राची ओळख झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील आघाडी सरकारला फटकारले आहे. (raosaheb danve slams maharashtra government over corona crisis)

रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधताना आघाडीला फटकारले आहे. कोविड संक्रमणाचा प्रादूर्भाव नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे. आता जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही योजना नाही, तेव्हा आघाडी सरकारने त्यांच्या नैतिक जबाबदारीपासून दूर पळत केंद्र सरकार वर दोषारोप सुरू केले आहेत, असा आरोप दानवे यांनी केला.

ऑक्सिजन प्लांट्सचं काय झालं?

केंद्राने सर्व राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी 162 प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची मंजुरी जानेवारी 2021 ला दिली होती. मंजूर केलेल्या 162 प्लांट्समधून अशा 10 प्लांट्सच्या इंस्टॉलेशनची मंजुरी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिली होती. परंतु महाराष्ट्र सरकारने या दिशेने कोणतेही कठोर पाऊले उचलले नाहीत, असा दावा त्यांनी केला.

तर परिस्थिती वेगळी असती

जानेवारी 2021ला प्लांट उभारण्यासाठी मंजुरी दिली असून या विषयावर युद्धपातळीवर जर काम केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. इतकंच हा नाही तर, या संपूर्ण योजनेचा खर्च केंद्र सरकारच करणार आहे. त्यासोबत यामध्ये सात वर्षासाठी लागणारा देखभाल खर्च देखील केंद्र सरकार देणार आहे. पण महाराष्ट्र सरकारकडून असे काहीही झाले नाही व यातूनच महाविकास आघाडीचा निष्काळजीपणा व बेजवाबदारपणा यातून स्पष्टपणे दिसून येतो, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईत जम्बो कोविड सेंटरला परवानगी

आज केंद्र सरकारकडून मिळण्याऱ्या सर्व मदतींमध्ये, महाराष्ट्र राज्याला मिळणारा वाटा सर्वात मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकार महाराष्ट्र राज्याला सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक 1784 मॅट्रीक टन ऑक्सिजन दिले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी देखील केंद्र सरकारने दिली आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली. या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड्स येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील, अस त्यांनी सांगितलं.

रेमडेसिवीरचा सर्वाधिक साठा

केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा देखील सर्वाधिक वाटा मिळतो आहे. तसेच 25 एप्रिल रोजी रुग्णालयांना ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्याच्या मोदींच्या निर्देशानुसार पीएम केअर्स फंडाने देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील 551 समर्पित प्रेशर स्विंग अडसोर्पशन (पीएसए) मेडिकल ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सच्या स्थापनेसाठी निधी वाटपाला तत्वत: मान्यता दिली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (raosaheb danve slams maharashtra government over corona crisis)

संबंधित बातम्या:

कोरोनाची दुसरी लाट भयंकर, आता घरातही मास्क लावण्याची वेळ आलीय : केंद्र सरकार

Maharashtra Coronavirus LIVE Update : चंद्रपुरात कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 1529 नवे रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार, अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा: मद्रास हायकोर्ट

(raosaheb danve slams maharashtra government over corona crisis)

Follow Us
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजे
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता...
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
निधी मिळत नाही कारण...निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण...तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगित
Vidhan Parishad | नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगितलंच
दार उघडलं आणि सर्वजण हादरले'; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
दार उघडलं आणि सर्वजण हादरले; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
मी लागतो नादाल चल, दाखव काय..., राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान
मी लागतो नादाल चल, दाखव काय..., राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार
ओमराजेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर! 28 जूनला मोठं घडणार; आठवड्याभरातच...
येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; नेत्याच्या मुलाची पोस्ट व्हायरल
उमरग्यात येऊन माफी मागा... ओमराजेंना आवाहन; बड्या नेत्याच्या मुलाची पोस्ट होतेय व्हायरल
षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
Eknath Shinde | षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान...
Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!