AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana and Ravi Rana : राणा दाम्पत्य उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार, राणा दाम्पत्य ठाम; शिवसेना काय भूमिका घेणार?

मातोश्रीवर शेकडोच्या संख्येनं शिवसैनिक जमा झाले आहेत. त्यांच्याकडून राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसंच राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावं असं आव्हान त्यांनी दिलंय. अशावेळी रवी राणा यांनी आपल्या खार इथल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचं जाहीर केलंय.

Navneet Rana and Ravi Rana : राणा दाम्पत्य उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार, राणा दाम्पत्य ठाम; शिवसेना काय भूमिका घेणार?
रवी राणा, नवनीत राणाImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 22, 2022 | 3:18 PM
Share

मुंबई : मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जात हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं आव्हान दिलं होतं. त्यानुसार ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे मातोश्रीवर (Matoshri) शेकडोच्या संख्येनं शिवसैनिक जमा झाले आहेत. त्यांच्याकडून राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसंच राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावं असं आव्हान त्यांनी दिलंय. अशावेळी रवी राणा यांनी आपल्या खार इथल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचं जाहीर केलंय. ‘उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार आणि हनुमान चालिसाचं पठण करणार’, असा दावा रवी राणा यांनी केलाय.

‘श्रीराम, बजरंगबलीचं नाव घेण्यापासून कुणी रोखू शकत नाही’

आण्ही कोणत्या परिस्थितीत हनुमान चालिसा वाचणार आहे. आम्ही उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार. कायदा सुव्यवस्थेचं पालन करणार, पोलिसांना सहकार्य करणार. बाळासाहेब ठाकरे असते तर एकदा नाही शंभरवेळा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी दिली असती. मी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केलं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली. मला मातोश्रीवर जाताना अटक केली, तुरुंगात टाकलं. मला आजही अमरावतीत बंदी करण्यात येणार होतं, तसे पोलिसांना आदेश होते. सरकार तुमचं आहे. तुम्ही आम्हाला आत टाकाल. पण जय श्रीराम आणि बजरंग बलीचं नाव घेण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही. आम्ही गोंधळ करणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवू देणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की तुम्ही येऊ नका, असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. त्याचबरोबर बाळासाहेबांचे सैनिक असतील तर माझ्यासमोर येऊन हनुमान चालिसा वाचतील, असा टोलाही राणा यांनी शिवसैनिकांना लगावलाय.

‘…तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिली असती’

बाळासाहेबांच्या विचाराचे सैनिक असते तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिली असती. महाराष्ट्राच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी वाचू दिली असती. महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते आम्हाला विरोध करत आहेत. समस्त हिंदू हे पाहत आहेत. ज्यांना आम्ही मुंबईत आलोय हे माहीत नाही. ज्यांनी अमरावतीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मुंबईला पाय ठेवून दाखवा असं म्हटलं होतं. मी पाय नाही, मी जिवंत उभा आहे. हनुमान चालिसा वाचण्यासाठी अशा धमक्या मिळत असतील तर एक नाही शंभर वेळा धमक्या सहन करेल पण आम्ही हनुमान चालिसा वाचणारच. शिवसेना भाजपमुळेच सत्तेत. मोदींचा फोटो लावून आमदार निवडून आणले. आमच्यावर भाजपचं खापर फोडू नये. आम्ही स्वबळावर निवडून आलो आहोत, असंही रवी राणा यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

Navneet Rana and Ravi Rana : राणा दाम्पत्य खारमधील निवासस्थानी, पोलिसांकडून 149ची नोटीस; शिवसैनिक अधिक आक्रमक

Sanjay Raut on Devendra Fadnavis : अडीच वर्षापूर्वी तुम्हाला सुबुद्धी मिळाली असती तर मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार