‘ये अंदर की बात हैं, समय बतायेगा’ अपक्ष आमदार रवी राणा यांचे सूचक वक्तव्य

अपक्ष आमदार रवी राणा (Ravi rana talk on maharashtra politics) यांनीही अजित पवारांची भेट घेतली.

'ये अंदर की बात हैं, समय बतायेगा' अपक्ष आमदार रवी राणा यांचे सूचक वक्तव्य

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (23 नोव्हेंबर) मोठा राजकीय भूकंप केला. राजभवनात जाऊन अजित पवार यांनी थेट भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून आज (24 नोव्हेंबर) सकाळपासूनच भाजप आमदार अजित पवारांच्या भेटीला येत होते. यावेळी अपक्ष आमदार रवी राणा (Ravi rana talk on maharashtra politics) यांनीही अजित पवारांची भेट घेतली.

यावेळी रवी राणा म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जरी सांगितले की, ते भाजपसोबत नाहीत, तरी ये अंदर की बात है समय बतायेगा, असे सूचक वक्तव्य रवी राणा (Ravi rana talk on maharashtra politics) यांनी केले.

भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वासही यावेळी अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला.

आमच्या संपर्कात शिवसेनेशिवाय राष्ट्रवादीचेही आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार आता कंटाळले आहेत. महाराष्ट्रात स्थिर सरकार येणे गरजेचे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आमदारांची फोडाफोड होऊ नये यासाठी आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे. तसेच प्रत्येक आमदारांना हॉटेलमधून बाहेर न पडण्याचे आदेशही दिले आहेत, असं सांगितले जात आहे.

अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीकडून वारंवार त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न होत आहेत.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले. परंतु अजित पवार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे दोन्ही नेत्यांना रिकाम्या हाती (NCP leaders Conviencing Ajit Pawar) परतावं लागलं.

Published On - 8:29 pm, Sun, 24 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI