AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाचा मोठा निर्णय, त्या नेत्याची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, समोर आलं मोठं कारण

कळंब नगरपालिकेतील नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा यांचं ड्रग्स प्रकरणात नाव समोर येताच, शिवसेना ठाकरे गटातून त्यांची तडकाफडकी हाकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा मोठा निर्णय, त्या नेत्याची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, समोर आलं मोठं कारण
त्या नगरसेवकाची पक्षातून हाकालपट्टी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 13, 2026 | 11:44 AM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, कळंब नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात नाव समोर येताच शिवसेना ठाकरे गटाने मोसीन सलीम मिर्झा यांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. परभणी पोलिसांच्या वतीनं ड्रग्ज तस्करीविरोधात करावाई करण्यात आली होती, या प्रकरणात कळंब नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा  यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी मिर्झांसह अन्य पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी मोसीन मिर्झा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

परभणी पोलिसांनी 72 ग्रॅम ड्रग्ज  ज्याची किंमत अंदाजे 14 लाख 63 हजार रुपये जप्त केली होती. या प्रकरणात आधी दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात कळंब नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा यांचं नाव देखील समोर आल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली होती.  त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना  7 ऑगस्ट रोजी मिर्झांसह अन्य पाच जणांना ताब्यात घेतलं.  मिर्झा यांना ताब्यात घेतल्यानंतर आता पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पक्षातून हकालपट्टी

परभणी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी 72 ग्रॅम ड्रग्ज जप्त केलं होतं, ज्याची किंमत अंदाजे 14 लाख 63 हजार रुपये एवढी आहे, या प्रकरणात पोलिसांनी आधी दोघांना अटक केलं, त्यानंतर या प्रकरणात मोसीन सलीम मिर्झा यांचं नाव देखील समोर आलं, मोसीन मिर्झा यांचं नाव समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे, मिर्झा यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हे ड्रग्ज प्रकरण सध्या जिल्ह्यात चांगलंच गाजत आहे.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी