अमरावती : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिला होता. त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र आता त्यांचा मातोश्रीवर जाण्याचा आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचण्याचा मुहूर्तही ठरला आहे. 22 एप्रिलला राणा मातोश्रीसमोर जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खासदार नवनीत राणाही (Navneet Rana) सोबत उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. विदर्भ एक्स्प्रेसने रवी राणा हे मुंबईत पोहोचणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत नवनीत राणा आणि रवी राणा हे महाविकास आघाडी आणि शिवसेनेला टार्गेट करत आहेत. सरकार मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतंय असा आरोपही काही दिवसांपूर्वीच राणा यांच्याकडून करण्यात आला होता.