स्वाभिमानीची ‘तोफ’ तोफखान्यात परतणार, रविकांत तुपकर ‘स्वाभिमाना’ने घरवापसीच्या तयारीत

भाजपच्या दारावर थाप देऊन आलेले रविकांत तुपकर यूटर्न घेत 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'त गृहप्रवेश करणार आहेत.

स्वाभिमानीची 'तोफ' तोफखान्यात परतणार, रविकांत तुपकर 'स्वाभिमाना'ने घरवापसीच्या तयारीत
Follow us
| Updated on: Oct 16, 2019 | 3:40 PM

मुंबई : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ला रामराम ठोकणारे, राजू शेट्टींचे खंदे समर्थक रविकांत तुपकर यांची पक्षात घरवापसी होण्याची चिन्हं आहेत. अवघ्या वीस दिवसांतच ‘सुबह का भुला’ स्वगृही परतण्याची शक्यता (Ravikant Tupkar to return to Swabhimani) आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन तुपकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुपकरांनी राजीनामा दिल्यामुळे राजू शेट्टींना मोठा धक्का बसला होता. रवीकांत तुपकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. परंतु एके काळचे सहकारी आणि ‘रयत क्रांती संघटने’च्या सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांनी संधान बांधलं होतं. मात्र आता तुपकर राजीनामा फाडून पुन्हा ‘स्वाभिमानी’चा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती आहे.

राजीनाम्यात काय लिहिलं होतं?

‘मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा” असं रवीकांत तुपकर यांनी म्हटलं राजीनाम्यात म्हटलं होतं.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तुपकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे ते नाराज होते. याच नाराजीतून आणि अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा देत भाजपची वाट धरल्याची चर्चा होती.

स्वाभिमानीची बुलंद तोफ, राजू शेट्टींचा खंदा समर्थक, प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकरांचा राजीनामा!

बुलडाण्यातील चिखली मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट तुपकरांना घालण्यात आली होती. भाजपच्या दारावर थाप देऊन आलेले तुपकर यूटर्न घेत ‘स्वाभिमानी’त गृहप्रवेश (Ravikant Tupkar to return to Swabhimani) करणार आहेत.

कोण आहेत रवीकांत तुपकर?

  • रवीकांत तुपकर हे बुलडाणा जिल्ह्यातील सावळा या गावचे आहेत.
  • राजू शेट्टींसोबत तुपकरांनी चळवळीत काम केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील अग्रणी चेहरा
  • बुलडाणा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं, त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली होती
  • सदाभाऊ खोत यांनी संघटना सोडल्यानंतर, स्वाभिमानीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळख होती
  • तुपकर हे खादी ग्रामोद्योग महामंडळावर होते, पण स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला
  • लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, पण जागा न मिळाल्यामुळे माघार
  • 2014 च्या विधानसभेला बुलडाण्यातून चिखलीतून इच्छा होती, पण माघार
  • चिखलीतून विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक, भाजपच्या संपर्कात होते
  • 26 सप्टेंबर 2019 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपद आणि सदस्यत्वाचा राजीनामा
Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.