Vidyanand Bapat: कोणताही मायचा लाल आला तरी… शिवसेनेच्या नेत्याचा विद्यानंद बापटांवर निशाणा

Vidyanand Bapat: गणेशोत्सव काळातील डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन सामाजिक कार्यकर्त्ये विद्यानंद बापट हे चर्चेत आले. त्यानंतर आता पुण्यात शिंदे गटाच्या नेत्याने बापट यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Vidyanand Bapat: कोणताही मायचा लाल आला तरी... शिवसेनेच्या नेत्याचा विद्यानंद बापटांवर निशाणा
Bapat
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 10:59 AM

राज्यात गणेशोत्सव काळातील डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन वाद सुरु होता. यावादात पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्ये विद्यानंद बापट यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी डीजेचा सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी देखील घेणे आवश्यक आहे असे म्हणत विरोध केला होता. त्यानंतर अनेकांनी बापट यांच्यावर टीका केली. आता पुण्यात शिंदे गटाचे नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी विद्यानंद बापट यांच्याविषयी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले.

माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी विद्यानंद बापट यांच्याविषयी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले. कुणीही दीडशहाण येतंय आणि गणेशोत्सवात डीजे बंद करा म्हणतयं. बापटाचे वाल हललेले आहेत. कोणताही मायचा लाल आला तरी उत्सव बंद करू शकत नाही. बापट कधी समाजात मदत करताना दिसत आहेत का? बापटांना उभं राहता येत नाही. बापटाचा चेहरा पाहिला तर असं वाटतं पाच मिनिटात पडेल की काय? त्याला सांभाळावं चक्कर येऊन पडेल की काय असं वाटतं असे धंगेकर म्हणाले.

Loading...

धंगेकरांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

पुढे त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. हिंदू धर्माला शिकवणारे अनेक शहाणे आले आहेत त्यातील हा एक शहाणा आलेला दिसतो. चंद्रकांत दादांचा हिंदू धर्माचा काही संबंध नाही. आम्ही त्यांना डोक्यावर घेतले बघू आता. पुणेकरांनी घेतलय डोक्यावर… आणलंय पुण्यात, सांभाळतोय आम्ही. सत्तेचा माज पुण्यात चालू आहे. कोल्हापूरची सगळी गुन्हेगारी पुण्यात आणली आहे. सर्व भाई त्यांचेच दिसत आहेत. काही दिवसाचा काय राहिला आहे तो लवकरच संपेल.

संजय गायकवाडांच्या विधाबाबत नेमकं काय म्हणाले?

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार आहेत. बरीच नावं डबल आणि बोगस आहेत. SIR मुळे माझ्या मतदारसंघातील 71 हजार मतं कमी झालेत असे म्हटले. रविंद्र धंगेकर यांनी संजय गायकवाड यांच्या या विधानावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, संजय गायकवाड हे खरं बोलतात. त्यांच्या पोटात आणि ओठात एकच असतं. राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यात जे दिसते ते खरं नाही असे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us