AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: शिवसेनेत बंड करणारे आमदार नंतर निवडून येत नाहीत, अजित पवारांनी भुजबळ, राणेंच्या बंडाचा इतिहास सांगितला

Ajit Pawar: शिवसेनेत ज्या ज्यावेळी बंड झालं. त्यावेळी नेते बाजूला गेले. त्यावेळी शिवसैनिक शिवसेनेसोबत राहिले हा इतिहास आहे. मी पाहिलेलं बंड सांगतो. शिवसेनेत छगन भुजबळ यांनी बंड केलं. त्यानंतर नारायण राणे यांचं बंड झालं.

Ajit Pawar: शिवसेनेत बंड करणारे आमदार नंतर निवडून येत नाहीत, अजित पवारांनी भुजबळ, राणेंच्या बंडाचा इतिहास सांगितला
शिवसेनेत बंड करणारे आमदार नंतर निवडून येत नाहीत, अजित पवारांनी भुजबळ, राणेंच्या बंडाचा इतिहास सांगितलाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 23, 2022 | 8:08 PM
Share

मुंबई: शिवसेनेत (shivsena) उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केलं आहे. शिवसेनेचे 47 आमदार घेऊन एकनाथ शिंदे आसाममध्ये गेले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तब्बल 10 ते 15 वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेनेत बंड होत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडल्याने शिवसेनेचे कसं होणार असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेना आता संपली आहे, असंही सांगितलं जात आहे. मात्र, या सर्व प्रश्नांवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar) यांनी अचूक भाष्य केलं आहे. शिवसेनेतील बंडाचा इतिहास सांगतानाच शिवसेना ही अभेद्य असल्याचंही त्यांनी दाखवून दिलं आहे. बंड करणारा नेताच राजकारणात टिकतो. त्याच्यासोबतचे नेते टिकत नाहीत, असा आजवरचा शिवसेनेचा इतिहास आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवसेनेत ज्या ज्यावेळी बंड झालं. त्यावेळी नेते बाजूला गेले. त्यावेळी शिवसैनिक शिवसेनेसोबत राहिले हा इतिहास आहे. मी पाहिलेलं बंड सांगतो. शिवसेनेत छगन भुजबळ यांनी बंड केलं. त्यानंतर नारायण राणे यांचं बंड झालं. ( यावेळी एका पत्रकाराने राज ठाकरे यांचं बंड झालं असं सांगितलं. त्यावर तो घरातला मामला होता गं बाई, असं अजितदादा म्हणाले) त्यात तिसरं आपल्या काळात घडलेलं एकनाथराव शिंदेंचं बंड. माझ्या पाहणीनुसार बंड करणारी व्यक्ती एकवेळ राजकारणात टिकते. पण बाकीचे टिकत नाहीत. शिवसैनिक शिवसेनेसोबत राहतात. बंड करणाऱ्यांसोबत राहत नाहीत. बंड करणाऱ्यांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जीवाचं रान करतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे, असं अजित पवार म्हणाले.

सरकार टिकवण्याचा प्रयत्न सुरू

अजित पवार यांनी यावेळी शिंदे यांच्या बंडांशी संबंधित अनेक बाबींवर भाष्य केलं. महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. हे सरकार कसं टिकेल त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आमचं काम सुरू आहे. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. आदित्य ठाकरे यांचा एका वेगळ्या कामासाठी फोन होता. त्यांच्याशीही चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं.

आमची दुसरी भूमिका नाही

आमची दुसरी काही भूमिका नाही. शिवसेनेतील घडामोडीबाबत शिवसेनेचे लोक सांगतील. काही आमदार परत आले आहेत. नितीन देशमुख आणि किशोर पाटील हे परत आले आहेत. तिथे काय झालं ते त्यांनी सांगितलं. त्यांचे आमदार चॅनेलवरून दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. आजही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आवाहन केलं आहे. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आमची भूमिका आघाडी सरकार टिकवण्याची आहे. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत, असंही ते म्हणाले.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?