फासावर दिलं तरी चालेल, ईव्हीएमवर शाई फेकून आरपीआय कार्यकर्त्याचा एल्गार

राज्यभरात विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Assembly Election) मतदान होत असतानाच ठाण्यात ईव्हीएमवर शाई फेकण्याचा (Ink  throw on EVM) प्रकार घडला आहे.

फासावर दिलं तरी चालेल, ईव्हीएमवर शाई फेकून आरपीआय कार्यकर्त्याचा एल्गार

ठाणे : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Assembly Election) मतदान होत असतानाच ठाण्यात ईव्हीएमवर शाई फेकण्याचा (Ink  throw on EVM) प्रकार घडला आहे. रिपब्लिकन कार्यकर्ते सुनिल खांबे यांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर आले असता निवडणूक कर्मचाऱ्यांकडील शाई बॉटल हिसकावत ईव्हीएमवर फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. खांबे यांनी शाई फेकत ‘ईव्हीएम मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या. या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ सुनिल खांबे यांना ताब्यात घेतले.


ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या मदतीने विरोधी पक्षातील मित्रपक्षांना संपवलं आहे. मला फासावर लटकवलं तरी चालेल, पण मी ईव्हीएमचा विरोध करत राहणार, असं मत सुनिल खांबे यांनी व्यक्त केलं. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी ईव्हीएमला विरोध करावा, असंही आवाहन केलं.

सुनिल खांबे इतर मतदारांप्रमाणेच मतदानासाठी आले. मात्र, त्यांनी अचानक निवडणूक कर्मचाऱ्यांकडील शाईची बॉटल हिसकावून ती ईव्हीएम कक्षावर फेकली. त्यामुळे काहीवेळ मतदान कर्मचारी देखील गोंधळले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत खांबे यांना मतदान केंद्राबाहेर काढत ताब्यात घेतले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI