विरोधकांच्या मयतभेटी सुरु, आर आर पाटलांचे पुत्र रोहित पाटील यांची टीका

| Updated on: Oct 06, 2019 | 4:17 PM

मूक मोर्चाला 'मुका मोर्चा' म्हणणाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवा. फुले शाहू आंबेडकरांचे विचार बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे, असंही रोहित आर आर पाटील म्हणाले.

विरोधकांच्या मयतभेटी सुरु, आर आर पाटलांचे पुत्र रोहित पाटील यांची टीका
Follow us on

सांगली : दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नीच्या प्रचारासाठी त्यांचे सुपुत्र रोहित आर आर पाटील यांनी सांगलीत आक्रमक भाषण केलं. विरोधकांच्या मयतभेटी सुरु झाल्या असून कावळा शिवूदे किंवा नको, मात्र विरोधक शिवत आहेत, अशा शब्दात रोहित पाटील (Rohit Patil Slams Shivsena) यांनी बोचरी टीका केली.

सांगलीतील तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सुमनताई आर आर पाटील यांना राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली आहे. सुमनताईंच्या प्रचाराचा शुभारंभ ढवळीमधून करण्यात आला. यावेळी रोहित पाटील यांनी घोड्यावरुन एन्ट्री घेतली.

दर वेळा पक्ष बदलणारे नेते आता शिवसेनेत गेले आहेत, मात्र सुमनताईंना इतकं बहुमत द्या की, त्यामुळे विरोधकांना 24 तारखेनंतर शिवधनुष्य घेऊन वनवासात जावे लागेल, असं आवाहन रोहित आर आर पाटील यांनी (Rohit Patil Slams Shivsena) केलं.

मूक मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणणाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवा. फुले शाहू आंबेडकरांचे विचार बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे, असंही रोहित आर आर पाटील म्हणाले.

निवडणुका जवळ आल्यावर विरोधकांच्या मयत भेटी सुरु झाल्या आहेत. कावळा शिवो अथवा ना शिवो, मात्र विरोधक शिवत आहेत. निवडणूक आली की तालुक्याची प्रतिष्ठा यांच्या लक्षात येते, अन्य वेळेस विरोधक कुठे असतात? असा सवालही रोहित पाटील यांनी केला.

Rohit Patil | राष्ट्रवादीने 2024 च्या निवडणुकीसाठी तासगावचा उमेदवार ठरवला

आमच्या मागण्या जर प्रेमाने मान्य होत नसतील, तर येत्या काळात त्या हिसकावून घेतल्या जातील, असा इशाराही रोहित पाटलांनी यावेळी दिला.

रोहित पाटील हे 2024 मधील तासगावचे उमेदवार असतील, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान शरद पवार यांना म्हणाले होते. आर आर आबांची पुण्याई इतकी मोठी आहे की यंदा सुमनताई पुन्हा निवडून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या 

आबा तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता, शरद पवार भावूक