
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या बेळगावात आहेत. बेळगावमध्ये जात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय.

बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला त्यांनी भेट दिली.

रोहित पवार यांनी यावेळी बेळगावातील मराठी बांधवांची बातचित करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मागच्या काही दिवसांपासून चिघळलेला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना अडवण्यात आलं.त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला.

दोन्ही बाजूने टीका टिप्पणी केली जात आहे. पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचा हा बेळगाव दौरा महत्वाचा आहे.