AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, फासा आम्हीच पलटणार, आता रोहित पवारांचं उत्तर

आपले आमदार जाऊ नयेत या भीतीने देवेंद्र फडणवीस असं बोलले असावेत, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीसांना लगावला. (Rohit Pawar Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, फासा आम्हीच पलटणार, आता रोहित पवारांचं उत्तर
रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस
| Updated on: Feb 08, 2021 | 2:52 PM
Share

अहमदनगर : “विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच भाजप हे महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi government) सरकार पडणार असल्याचं दर तीन महिण्यांनी सांगतात. आपले आमदार जाऊ नये या भीतीने ते असं बोलले असावेत,” असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी फडणवीसांना लगावला. ते अहमदनगरमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. (Rohit Pawar criticizes Devendra Fadnavis for commenting on Maha Vikas Aghadi government)

देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

“महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं पहिल्या दिवसापासून म्हणणाऱ्या लोकांना हे सरकार अजूनही चालत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे दर तीन महिन्याला सरकार पडणार असल्याचं विरोधक सांगतात. आपले आमदार जाऊ नये या भीतीने कदाचित देवेंद्र फडणवीस बोलत असावेत, असं रोहित पवार म्हणाले.

अमित शाहांवर टीका

तसेच यावेळी बोलताना रोहित पवार यांनी अमित शाहा यांच्यावरही टीका केली. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंचे तत्व सोडले आहे. आम्ही तुमच्यासारखे वागलो असतो तर शिवसेना पक्ष संपला असता, अशा शब्दात अमित शाहा यांनी शिवसेनेवर टीका केली होती. तसेच, शिवसेनाला मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिलं नव्हतं असंही अमित शाह यावेळी सांगितलं होत. पुढे बोलताना त्यांना महाविकास आघाडीवरसुद्धा टीका केली होती. त्यानंतर आता शाह यांचा वक्तव्यांचा रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतलाय. “भाजपमधील कोणत्याही व्यक्तीला महाविकास आघाडीचा प्रयोग पचलेला नाही. भाजपने विश्वासघात केल्याची भावना शिवसेनेमध्ये होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून देशातली जनतेसमोर एक वेगळा संदेश गेलेला आहे. या प्रयोगामुळे भाजपसोबत युती केलेल्या देशातील स्थानिक मित्रपक्षांनी भाजपबद्दल बोलताना आवाज वाढवला आहे. याच गोष्टीमुळे अमित शाह तसे बोलले असतील,” असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, राज्यात राजकीय वारे गरम झाले असून भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्यानंतर तर राज्यात राजाकीय वातारवण चांगलेच तापले आहे. शिवसेना, राष्ट्रावादी तसेच काँग्रस हे तिनही पक्ष मिळून भापजवर सडकून टीका करत आहेत. तर भाजपसुद्धा हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा दावा करत आहे.

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीस मित्र आहेत, पण काहीही बोलतात : नाना पटोले

फासा आम्हीच पलटणार; देवेंद्र फडणवीसांनी दिले सत्तांतराचे संकेत

राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात; फडणवीसांची स्तुतीसुमनं

(Rohit Pawar criticizes Devendra Fadnavis for commenting on Maha Vikas Aghadi government)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.