देवेंद्र फडणवीस मित्र आहेत, पण काहीही बोलतात : नाना पटोले

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मित्र आहेत पण ते काहीही बोलतात, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. (Nana Patole criticizes Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस मित्र आहेत, पण काहीही बोलतात : नाना पटोले
नाना पटोल आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मित्र आहेत पण ते काहीही बोलतात, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्ष नावालाही उरणार नाही, असा विश्वासाही त्यांनी यावेळी व्यक्त केला. फडणवीस यांनी सत्तांतरांचे संकेत देत फासा आम्हीच पलटणार, असे विधान 5 फेब्रुवारी रोजी केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी वरील विधान केले. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Nana Patole criticizes Devendra Fadnavis for commenting on maha vikas Aghadi government)

“देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. पण ते काहीही बोलतात. राज्यात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही होणार नाही. भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही,” असे नाना पटोले म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पटोले यांनी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले. त्यांनी “देशातील सेलिब्रिटींना सरकारच्या बाजूने आता‌ ट्विट करता येतं. पण त्यांना जनतेच्या प्रश्नांवर ट्विट करता येत नाही,” असे म्हणत क्रिकेटपटू आणि सिनेतारकांना धारेवर धरलं.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं आश्वासान दिलं नव्हतं असं वक्तव्य करुन महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. शाहांच्या वक्तव्यावर बोलताना, “भाजप आणि शिवसेनेत‌ काय बोलणं झालं हे मला माहिती नाही. शाह तब्बल एका वर्षांने बोलले आहेत. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का?, असा सवाल करत शाहांच्या वक्तव्याची पटोले यांनी खिल्ली उडवली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल असं फडणवीस म्हणाले,” असं वक्तव्य फडणवीस यांनी 5 फेब्रुवारी रोजी केलं होतं.

 

संबंधित बातम्या :

फासा आम्हीच पलटणार; देवेंद्र फडणवीसांनी दिले सत्तांतराचे संकेत

राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात; फडणवीसांची स्तुतीसुमनं

फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय, सरकार पाडण्याच्या दाव्यावर भाई जगतापांचा हल्लाबोल

(Nana Patole criticizes Devendra Fadnavis for commenting on maha vikas Aghadi government)

 

Published On - 12:53 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI